---Advertisement---

माजी ऑसी यष्टीरक्षकाने सांगितली टी२० विश्वचषकातील भारतीय संघाची सर्वात मोठी कमजोरी

On: बुधवार, ऑक्टोबर 27, 2021 8:05 PM
---Advertisement---

भारतीय संघाला आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली होती. या सामन्यात भारतीय संघातील फलंदाजांच्या आणि गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाला १० गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या माजी यष्टिरक्षक फलंदाजाने भारतीय संघाच्या कमजोरी बाबत मोठे वक्तव्य केले आहे.

हार्दिक पंड्या गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघासाठी अष्टपैलू कामगिरी करत आहे. तो विस्फोटक फलंदाजीसह गोलंदाजीमध्ये देखील भारतीय संघाला सामना जिंकून द्यायचा. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून तो दुखापतग्रस्त होत असल्यामुळे त्याला गोलंदाजी करता येत नाहीये. त्याला आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत फलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे. ज्यामुळे संघात एका गोलंदाजाची कमतरता जाणवू लागली आहे. ज्याचा परिणाम पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पाहायला मिळाला होता.

याबाबत बोलताना ऑस्ट्रेलिया संघाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज ब्रॅड हॅडिन म्हणाला की, “भारतीय संघात सहावा गोलंदाज नसणे ही त्यांची सर्वात मोठी कमतरता आहे. हार्दिक पंड्या गोलंदाजी करत नाहीये, ज्यामुळे भारतीय संघाला अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यांनी सहाव्या गोलंदाजाची कमतरता दूर करण्यासाठी दुसऱ्या अष्टपैलू खेळाडूला स्थान द्यायला पाहिजे का? त्यांना काही मोठे निर्णय घ्यावेच लागतील.”

हार्दिक पंड्याला पर्यायी खेळाडू म्हणून शार्दुल ठाकूर आहे. परंतु त्याने फलंदाजी करताना त्याने जास्त योगदान दिले नाहीये. ज्यामुळे त्याला संघात स्थान दिले जात नाहीये. ब्रॅड हॅडिनचा मते भारतीय संघाला या गोष्टीची जास्त चिंता नसेल.

तो पुढे म्हणाला की, “मला नाही वाटत की, भारतीय संघ या गोष्टीचा जास्त विचार करत असेल. विराट कोहली पत्रकार परिषदेत काय म्हटला हे मी ऐकले. तो म्हणाला की,भारतीय संघ एका मजबूत संघाकडून पराभूत झाला आहे आणि असे होत असते. हा पहिलाच सामना होता.”

भारतीय संघाचा पुढील सामना ३१ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड संघाविरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘माझ्यासाठी फक्त एक बातमी’, डी कॉकने ब्लॅक लाईव्ह मॅटर्स मोहिमेला नकार दिल्यानंतर पोलार्डची प्रतिक्रीया

अन् दत्ता गायकवाडांचा ‘पठ्ठ्या’ इरफान भारतीय संघाचा पुढचा कपिल होता होता राहिला

वॉर्नरच्या आईने ‘तो’ एक निर्णय बदलला नसता तर जगाला दिग्गज क्रिकेटपटू मिळाला नसता!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---