आगामी दुलीप ट्राॅफी (Duleep Trophy) स्पर्धा खेळली जाणार आहे. (5 सप्टेंबर) रोजी भारताच्या सध्याच्या कसोटी संघातील अनेक खेळाडू आणि जे राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवण्याच्या मार्गावर आहेत, ते 2024-25 देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात करण्यासाठी बेंगळुरू आणि अनंतपूर येथे दुलीप ट्रॉफीसाठी कार्यरत असणार आहेत.
सध्या सुरु होणाऱ्या दुलीप ट्रॉफीच्या (Duleep Trophy) नवीन फॉरमॅटमध्ये चार संघ ए, बी. सी आणि डी स्पर्धा करणार आहेत आणि अव्वल दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. भारताचे माजी पुरुष गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्या मते, 7 जानेवारी 2025 पर्यंत भारताने दहा कसोटी सामने खेळण्यापूर्वी सुधारित दुलीप ट्रॉफी ही गोलंदाजांचे मूल्यांकन करण्याची योग्य संधी आहे.
भरत अरुण म्हणाले, “सर्व क्रिकेटपटूंना पुरेशी षटकं टाकण्याची संधी मिळते. तसेच ते लाल बॉलसह कशी कामगिरी करतात हे पाहणे ही एक उत्तम आहे. निवडकर्त्यांनी 18-20 खेळाडूंची निवड केली आहे, बरोबर? त्यामुळे त्यांनी काही गोलंदाजांवर लक्ष केंद्रित केले असेल याची मला खात्री आहे.”
भरत अरुणने आयएएनएसशी विशेष संवाद साधताना सांगितले की, “दुलीप ट्रॉफी तुम्हाला गोलंदाजांचे मूल्यांकन करण्यासाठी योग्य व्यासपीठ देते. याशिवाय, गोलंदाजांना पुरेशी षटके टाकण्याची संधी मिळते जेणेकरुन ते (भविष्यात) कसोटी मालिकेसाठी तयारी करण्यासारखे आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघात निवड झाल्यावर राहुल द्रविडचा मुलगा भावूक! म्हणाला…
“तो अतिशय व्यावहारिक…”, दिग्गज क्रिकेटपटूचं गौतम गंभीरबाबत लक्षवेधी वक्तव्य
‘हिटमॅन’च्या निशाण्यावर वीरेंद्र सेहवागचा जबरदस्त रेकॉर्ड… बांगलादेश मालिकेत रचणार इतिहास!