---Advertisement---

बिग ब्रेकिंग! दिग्गज बॉक्सर माईक टायसनवर महिलेने लावला बला’त्काराचा आरोप, प्रकरण 33 वर्षांपूर्वीचं

On: बुधवार, जानेवारी 25, 2023 12:50 PM
Mike-Tyson
---Advertisement---

क्रीडाजगतातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बॉक्सिंगच्या दुनियेतील ‘बॅडमॅन’ म्हणून ओळखला जाणारा माजी बॉक्सर माईक टायसन याच्याविषयी ही बातमी आहे. रिंगच्या आत असो किंवा बाहेर दोन्ही ठिकाणी टायसन वादाच्या भोवऱ्यात अनेकदा अडकला आहे. 56 वर्षीय टायसन आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका महिलेने माईक टायसनवर बला’त्काराचा आरोप लावण्यात आला आहे.

हे प्रकरण 33 वर्षांपूर्वीची म्हणजेच 1990च्या सुरुवातीची आहे. अल्बानी नाईट क्लबमध्ये भेटल्यानंतर माईक टायसन (Mike Tyson) याने लिमोझिनमध्ये तिच्यावर बला’त्कार केला, ज्यामुळे तिला शारीरिक, मानसिक आणि भावनिक दुखापत झाली, असे म्हणत महिलेने 5 मिलियन डॉलर्सचा खटला दाखल केला आहे.

नकार देऊनही केला अत्या’चार- पीडितेचा आरोप
आरोप करणाऱ्या महिलेने तिच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की, ती जेव्हा लिमोझिनमध्ये टायसनला भेटायला गेली, तेव्हा त्याने लगेच तिला स्पर्श करण्यास आणि किस करण्यास सुरुवात केली. महिलेने म्हटले की, “मी त्याला असे करण्यास अनेकदा नकार दिला. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने माझे एकही ऐकले नाही आणि माझ्यावर बला’त्कार केला.” महिलेने लावलेल्या आरोपांची तपासणी तिचे वकील डॅरेन सेल्बॅक यांनी केली असता, त्यांना आढळून आले की, तिने जे काही म्हटले आहे, त्यात तथ्य आहे.

https://www.instagram.com/p/CdrNxUcJKTK/?hl=en

काय म्हणाला महिलेचा वकील?
महिलेच्या वकिलाने एका वेगळ्या अर्जात म्हटले की, त्यांच्या कार्यालयाने महिलेच्या म्हणणे ऐकून घेतलेच. त्यासोबतच तिच्या आरोपांची चौकशीदेखील केली. त्यात असे आढळून आले की, हे सर्व तथ्य आहे. सेल्बॅकने मंगळवारी (दि. 24 जानेवारी) म्हटले की, ते या प्रकरणी आणखी भाष्य करू शकत नाहीत.

तक्रारीत तारखेचा नाही उल्लेख
महिलेच्या प्रतिज्ञापत्रात घटनेच्या तारखेचा उल्लेख करण्यात आला नाहीये. मात्र, यामध्ये सांगण्यात आले आहे की, 1990च्या दशकात सुरुवातीला तिच्यासोबत असे झाले आहे. जवळपास त्यावेळच्या सौंदर्यस्पर्धेतील स्पर्धक देसिरी वॉशिंग्टनने म्हटले होते की, टायसनने इंडियानापोलिसमध्ये तिच्यासोबत बला’त्कार केला. टायसनला 10 फेब्रुवारी, 1992मध्ये वॉशिंग्टनसोबत बला’त्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. त्यासाठी त्याला 3 वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली होती.

बालपणीच झाली होती 38 वेळा अटक
न्यूयॉर्कच्या ब्रूकलिन येथे 30 जून, 1966 रोजी जन्मलेल्या माईक टायसन हा बालपणीपासूनच खोडकर स्वभावाचा राहिला आहे. बालपणी त्याला व्यवस्थित बोलता येत नसल्यामुळे लोक त्याची खिल्ली उडवायचे. असे म्हटले जाते की, तो इतका खोड्या करायचा की, 13 वर्षांच्या वयात त्याला तब्बल 38 वेळा अटक झाली होती. (former boxer mike tyson accused of raping women lawsit filed for allegations seeking 5 million us dollars)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ गोलंदाजामुळे आख्ख्या न्यूझीलंड संघाची मान शरमेनं खाली, भारतीय फलंदाजांनी धू धू धुतलं
विराट अन् गिल नाही, तर कॅप्टन रोहितने ‘या’ खेळाडूला म्हटले टीम इंडियाचा ‘जादूगार’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---