बारतीय क्भारिकरतीय क्रिकेट संघाने चमकादार कामगिरी करत टी20 विश्वचषक 2024 वर आपले नाव कोरले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने 140 कोटी भारतीयांचे स्वप्न पूर्ण केले आहे. या विजायामुळे विश्वाच्या चारही बाजूंनी भारतीय क्रिकेटपटूंच काैतूक होत आहे. दरम्यान भारतीय संगाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने देखील भारतीय क्रिकेट संघाचे काैतुक केले आहे.
भारताचा पहिला टी20 विश्वचषक चॅम्पियन कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह सध्याच्या आणि माजी क्रिकेटपटूंनी टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाचे कौतुक केले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिला टी20 विश्वचषक जिंकला होता.
महेंद्रसिंग धोनीने इंस्टाग्रामवर लिहिले, ‘वर्ल्ड कप चॅम्पियन 2024. माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. शांत राहून आणि आत्मविश्वास राखून चमकदार कामगिरी केली. विश्वचषक घरी आणल्याबद्दल देशातील आणि जगभरातील सर्व भारतीयांच्या वतीने अभिनंदन. बर्थडे गिफ्टसाठी धन्यवाद.’ धोनी पुढील महिन्यात 43 वर्षांचा होईल.
MS Dhoni edited his Instagram post and added “thanks for the priceless birthday gift”. ❤️ pic.twitter.com/u7IaqjQtYv
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 29, 2024
यंदाचे टी20 विश्वचषक भारतीय संगाचे शिलेदार विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मासाठी शेवटचा सामना ठरला. टी20 विश्वचषक विजयानंतर दोघांनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती झाहीर केली आहे. भारतीय चाहते विराट आणि रोहितने दिलेल्या भारतीय संघासाठी योगदान विसरणे अशक्य आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात तब्बल 17 वर्षानंतर भारतीय संघ टी20 विश्वविजेता ठरला आहे.
महत्तवाच्या बातम्या-
“मागील काही दिवसांत मी…” टी20 विश्वचषकानंतर हार्दिक पांड्याने उघड केल्या वेदना
धक्कादायक…! विराट पाठोपाठ रोहित शर्माची देखील टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती
आनंदात धक्कादायक क्षण…!!! विराटची टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर