आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने आणि रणनीतीने क्रिकेट प्रेमींच्या मनात खास स्थान करणारे खूप खेळाडू आहेत. त्या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि विराट कोहली यांची गणना होता. या दोघांच्या फलंदाजीचे चाहते जगभरात आहेत. अशात भारतात गुगलने सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या व्यक्तींची यादी जारी केली आहे. विशेष म्हणजे, या यादीत एमएस धोनी आणि विराट कोहली यांचे नाव नाहीये.
यावर्षी म्हणजेच 2022मध्ये भारतात गुगलवर सर्वाधिक सर्च केला जाणारा खेळाडू इतर कुणी नसून मराठमोळा अनुभवी फिरकीपटू प्रवीण तांबे (Pravin Tambe) आहे. विशेष म्हणजे, तो यावर्षी आयपीएल किंवा भारतीय संघाचा भागही नव्हता. या यादीत तो कसा आला? या मागील कारण त्याची बायोपिक ‘कौन प्रवीण तांबे?’ (Kaun Pravin Tambe?) आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याने प्रवीण तांबेची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 1 एप्रिल, 2022 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला होता.
खरं तर, प्रवीण तांबे ट्विटरवर सर्वाधिक सर्च (Pravin Tambe) केल्या जाणाऱ्या यादीतही आहे. तो भारतात सर्वाधिक सर्च केला जाणारा व्यक्तींमध्ये नववा आहे. प्रवीण तांबेच्या क्रिकेटचा प्रवास (Pravin Tambe Cricket Journey) खूपच प्रेरणादायी राहिला आहे. त्याला 41 वर्षांच्या वयात 2013मध्ये राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएलमध्ये आपल्या ताफ्यात सामील केले होते. त्यापूर्वी त्याने आपल्या आयुष्यात कोणत्याही स्तरावर एकदाही प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळला नाहीये.
Google has released its top search results for the year 2022…
Top 10 'People' on Google Year in Search 2022:
1 #NupurSharma
2 #DroupadiMurmu
3 #RishiSunak
4 #LalitModi
5 #SushmitaSen
6 #AnjaliArora
7 #AbduRozik ✅❤️🔥 ( #BB16)
8 #EknathShinde
9 #PravinTambe
10 #AmberHeard pic.twitter.com/1YSYlV7CAH— Team Abdu Rozik Official FC 👑 (@Team_Abdu_Rozik) December 7, 2022
त्याने 2014मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाविरुद्ध जबरदस्त हॅट्रिक घेतली होती. त्यानंतर 2020मध्ये त्याने टी10 लीगमद्ये भाग घेतल्यानंतर भारतीय क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात खेळण्यावर बंदी घातली गेली. यानंतर तो आता कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी एक फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकाच्या रूपात काम करत आहे. (former captain ms dhoni and virat kohli not in top 10 search on google in india pravin tambe is on 9th)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी खेळाडूची टीम इंडियावर कडाडून टीका; म्हणाला, ‘आयपीएलचा विचार सोडा, देशाचा विचार करा’
टीम इंडियासाठी ‘करो वा मरो’ परिस्थिती; कधी, कुठे आणि कसा पाहता येईल शेवटचा वनडे सामना?