भारतीय संघात असे अनेक खेळाडू होऊन गेले, ज्यांनी यशस्वी क्रिकेटपटू म्हणून आपली ओळख निर्माण केली. या खेळाडूंमध्ये एमएस धोनी याच्या नावाचाही समावेश होतो. धोनीने 15 ऑगस्ट, 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, पण तो अजूनही आयपीएल खेळताना दिसतो. मात्र, आता मैदानापाठोपाठ सिनेइंडस्ट्री गाजवण्यासाठीही धोनी सज्ज झाला आहे. धोनीबद्दल अशी बातमी आहे की, त्याने प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे. धोनीच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया…
सिनेजगतात दाखवणार जलवा
एमएस धोनी (MS Dhoni) याने त्याचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे. धोनीच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव ‘धोनी एंटरटेनमेंट’ असे आहे. याची माहिती लेट्ससिनेमाने रविवारी (दि. 9 ऑक्टोबर) ट्वीट करत दिली आहे. त्यांनी यासोबत एक फोटोही शेअर केला आहे. यामध्ये धोनी आणि त्याच्या प्रोडक्शन हाऊसचे नावही दिसत आहे.
#LetsCinema EXCLUSIVE: Dhoni is launching his film production company in south ‘Dhoni Entertainment’ to produce films in Tamil, Telugu and Malayalam. pic.twitter.com/zgTxzdSynT
— LetsCinema (@letscinema) October 9, 2022
एकूण 3 भाषांमध्ये बनणार सिनेमे
एमएस धोनी याच्या प्रोडक्शन हाऊसचे पोस्टर समोर आले आहे. या पोस्टरमध्ये दिसते की, त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या अंतर्गत तेलुगू, मल्याळम आणि तमिळ सिनेमे बनवले जातील. धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळतो, त्यामुळे त्याचा तमिळनाडूमध्येही भलामोठा चाहतावर्ग आहे. नुकतेच धोनीने चेन्नईचाही दौरा केला होता.
जाहिरातीतही केलंय धोनीने काम
क्रिकेटमध्ये आपल्या चाणाक्ष रणनीतींसाठी ओळखला जाणारा धोनी जाहिरातींमध्येही झळकला आहे. टी20 विश्वचषक 2022साठी आधी त्याने ओरिओ बिस्कीट लाँचची जाहिरात केली होती. तसेच, युवराज सिंग आणि सचिन तेंडुलकर यांच्यासोबतच्या जाहिरातींमध्येही तो दिसला आहे. विशेष म्हणजे, त्याच्या आयुष्यावर ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा सिनेमाही बनवण्यात आला आहे. या सिनेमात धोनीची भूमिका दिवंगत सुशांत सिंग राजपूत याने साकारली होती.
भारतीय संघाला जिंकून दिले 2 विश्वचषक
एमएस धोनीला सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखले जाते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 चा टी20 विश्वचषक आणि 2011चा वनडे विश्वचषक जिंकून दिला आहे. यात आणखी भर म्हणजे, त्याने भारतीय संघाला 2013 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकून दिली आहे. धोनी डीआरएस घेण्याच्या बाबतीत खूपच चाणाक्ष आहे. विशेष म्हणजे, त्याची रणनीती नेहमीच संघासाठी फायदेशीर ठरते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Asia Cup: स्नेह राणाच्या फिरकीसमोर थायलंडचे वाजले बारा! अवघ्या 37 धावांत टीम ऑलआऊट
T20 World Cup: वॉर्म-अप सामन्यावेळी विराट कोहलीने केले असे काही, व्हिडिओ होतोयं तुफान व्हायरल