इंग्लंडचा कर्णधार जो रूट सध्या त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. मागील सलग तीन कसोटी सामन्यात त्याने शतकी खेळी केली आहे. त्यात दोन द्विशतकांचा समावेश आहे. नुकतेच त्याने भारताविरुद्ध चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात २१८ धावांची द्विशतकी खेळी केली होती. त्याच्या द्विशतकाच्या जोरावर इंग्लंडने २२७ धावांनी भारताला पराभूत केले. अशा परिस्थितीमध्ये इंग्लंडचे माजी कर्णधार नासीर हुसेन यांना असा विश्वास आहे की हा फलंदाज इंग्लंडचे फलंदाजीतील सर्व विक्रम मोडू शकतो.
हुसेन यांचे म्हणणे आहे की, रूट हा फिरकीपटूंचा सामना करणारा देशातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे आणि सोबतच इंग्लंडच्या फलंदाजांनी केलेल्या सर्व विक्रमांना तो तोडू शकतो.
‘स्काय स्पोर्टस’ च्या एक स्तंभात त्यांनी लिहिले होते की, “तो फक्त ३० वर्षाचा असून सुद्धा चांगल्या प्रकारे खेळतो, जर इंग्लंडच्या सर्वकालिक सर्वोत्तम फलंदाजांची यादी केली तर या यादीत कुक, ग्रॅहम गूच, आणि केविन पीटरसन सोबतच रूटचा समावेश देखील नक्कीच असेल.”
पुढे ते म्हणतात की, ‘हे खरं आहे की रूट सर्वात महान फलंदाजांपैकी एक आहे आणि तो सर्वच विक्रम तोडेलही त्याचप्रमाणे तो एलिस्टर कुकच्या १६१ कसोटी सामन्यांचा आणि त्यानी केलेल्या धावांचा देखील आकडा ओलांडू शकतो. एवढी क्षमता त्याच्यात आहे.’
तसेच हुसेन इंग्लंडच्या विजयाबद्दल म्हणाला, ‘भारतीय मैदानात त्यांच्याविरुद्ध जिंकणे ही फार महत्वाची बाब आहे आणि इंग्लंडने ते करून दाखविले. लोक इंग्लंड संघाला कमकुवत मानत होते आणि म्हणत होते की इंग्लड हा सामना मोठ्या फरकाने हरेल. परंतु ते तसे झाले नाही.’
रुटचा १०० वा कसोटी सामना –
भारताविरुद्धचा चेन्नईतील पहिला कसोटी सामना हा रुटचा कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना होता. विशेष म्हणजे २०१२ साली त्याने कारकिर्दीतील पहिला कसोटी सामनाही भारतातच नागपूरला खेळला होता. त्यामुळे परदेशातील एकाच देशात आपला पहिला आणि शंभरावा कसोटी सामना खेळणारा रूट हा जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे.
यापूर्वी भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिलदेव यांनी आपला पहिला आणि शंभरावा कसोटी सामना पाकिस्तानमध्ये त्यानंतर वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कार्ल हुपरने देखील आपला पहिला व शंभरावा मायेदेशाबाहेर एकाच देशात कसोटी सामना भारतामध्ये केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
बंगलोरच्या संघात संजय बांगर यांची ‘रॉयल’ एंट्री, संघासाठी पार पाडणार ‘ही’ भूमिका
एकेकाळी बूट घ्यायला ही पैसे नसणारी सोनाली शिंगटे आज आहे भारतातील सर्वोत्कृष्ट कबड्डीपटूंपैकी एक
“रहाणे आणि रोहितला संघातून काढून टाकण्याची वेळ आली आहे,” चाहत्यांचा हल्लाबोल