रविवारी (दि. 5 फेब्रुवारी) दुबई येथे पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि लष्कर प्रमुख परवेज मुशर्रफ यांचे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे पाकिस्तानमध्ये शोककळा पसरली आहे. राजकारणात विशेष प्रसिद्ध असणाऱ्या परवेज यांना क्रिकेटही फार आवडायचे. महत्त्वाचं म्हणजे, त्यांनी एकदा सौरव गांगुली यांना भारतीय कर्णधार असताना फोन करून चेतावणी दिली होती. ते म्हणाले होते की, दोन्ही देशांमध्ये युद्ध होईल. काय होता तो किस्सा, चला जाणून घेऊया…
परवेज मुशर्रफ यांनी भारतीय कर्णधाराला दिलेली चेतावणी
सन 2004मध्ये सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केला होता. यादरम्यान भारतीय संघाने कसोटी मालिका आणि वनडे मालिकेतील आपला दबदबा दाखवत पाकिस्तानला पराभूत केले होते. पाकिस्तानात 50 वर्षांमध्ये पहिल्यांदा विजय मिळवल्यानंतर कर्णधार गांगुली खूपच खुश झाले होते. गांगुलींनी या मालिकेनंतर आठवण काढत म्हटले होते की, “वनडे सामना जिंकल्यानंतर मी भारतातून आलेल्या मित्रांसोबत जेवण करण्यासाठी बाहेर गेलो होतो. मला सुरक्षेसाठी पोलिसांना न्यायचे नव्हते. कारण, मला पाकिस्तानात सतत बंदूकच दिसायची. त्यावेळी आम्ही असेच निघालो, परंतु फूड स्ट्रीटवर जेवण करताना पकडले गेलो. त्यादिवशी रात्री आम्ही परत आलो.”
पुढे बोलताना गांगुली म्हणाले की, “दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता मला परवेज मुशर्रफ यांचा फोन आला आणि त्यांनी म्हटले की, आता असे करू नका. कारण, जर काही झाले, तर दोन देशांमध्ये भांडण होईल, युद्ध होईल. हे इतके संवेदनशील होते. त्यावेळी मी त्यांना समजावले की, थोडे स्वातंत्र्य हवे होते म्हणून गेलो होतो. यापुढे असे करणार नाही.”
सन 2001-2008दरम्यान भूषवले राष्ट्रपतीपद
परवेज मुशर्रफ यांनी 20 जून 2001 ते 18 ऑगस्ट 2008 दरम्यान पाकिस्तानचे राष्ट्रपतीपद भूषवले. विशेष म्हणजे, 1998मध्ये ते पाकिस्तानचे लष्कर प्रमुखही बनले होते. मुशर्रफ दीर्घ काळापासून अमायलॉयडोसिस आजाराने ग्रस्त होते. तसेच, त्यांच्यावर दुबईच्या एका रुग्णालयात उपचार सुरू होते. जून 2022मध्ये त्यांच्या कुटुंबीयांनी ट्विटरवरून माहिती देत म्हटले होते की, ते अमायलॉयडोसिस नावाच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यानंतर ते अनेक महिने रुग्णालयातच दाखल होते. (former captain sourav ganguly reveals hilarious conversation with pervez musharraf on phone call)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा पाकिस्तानचे राष्ट्रपतीही झालेले ‘माही’च्या हेअरस्टाईलचे फॅन, सर्वांसमोर केली होती ‘ही’ खास विनंती
ब्रेकिंग! पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतींना देवाज्ञा, दुबईच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास