टीम इंडियाच्या खेळाडूंकडे कोणत्याही दौऱ्यादरम्यान 150 किलोपेक्षा जास्त सामान असेल, तर बीसीसीआयकडून त्याचं अतिरिक्त शुल्क भरलं जाणार नाही अशी बातमी समोर आली आहे. यावर आता माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी प्रतिक्रिया दिली.
आकाश चोप्रा यांनी X ( ट्विटरवर) लिहिलं की, “क्रिकेट दौऱ्यावर कुणालाही 150 किलोपेक्षा जास्त सामानाची गरज का भासते? क्रिकेट किट-बॅग साधारण 40 किलोची असते. ज्यामध्ये 15 बॅट्स 20 किलोपेक्षा कमी वजनाचे असतील. मग बाकी 110 किलो कपडे घेऊन प्रवास केला जातो का?” त्यांच्या या प्रतिक्रियेवर सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, काही जण आकाश चोप्रांच्या विधानाला समर्थन करताना दिसत आहेत.
बीसीसीआयच्या आढावा बैठकीत खेळाडूंच्या कामगिरीचा विचार करता मोठी नियमावलीची घोषणा करण्यात आली. खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा होईल असा बीसीसीआयचा विश्वास आहे. बीसीसीआयच्या आढावा बैठकीत काही मोठे निर्णय झाल्याचं वृत्त समोर आलं, ज्यामध्ये खेळाडूंची कामगिरी चांगली नसल्यास त्यांच्या पगारात कपात केली जाईल असा निर्णय घेण्यात आला. याचा उद्देश असा असेल की, खेळाडूंना त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी जबाबदार राहावं लागेल. म्हणजेच कामगिरी खराब झाली, तर पगारातही कपात केली जाईल.
भारतीय क्रिकेट बोर्डानं ज्याप्रकारे पगारात कपात करण्याचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे आणखीन एक मोठा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे. हा निर्णय म्हणजे खेळाडूंच्या कुटुंबियांना त्यांच्यासोबत नेण्याचा. नव्या नियमानुसार, जर टीम इंडिया दौऱ्यावर गेली तर 45 दिवसांच्या दौऱ्यात ते त्यांच्या कुटुंबासोबत किंवा पत्नीसोबत जास्तीत जास्त 2 आठवडे राहू शकतील. खेळाडूंना त्यांच्या कुटुंबाला यापेक्षा जास्त काळ एकत्र राहण्याची परवानगी दिली जाणार नाही.
हेही वाचा –
स्मृती मंधानानं एकाच खेळीत मोडले अनेक रेकॉर्ड, भारतासाठी अशी कामगिरी करणारी पहिलीच खेळाडू
भारतीय महिला संघासाठी वनडे सामन्यांमध्ये सर्वात मोठ्या 3 भागीदारी, मंधाना-प्रतीका अव्वलस्थानी
बुमराह-आकाशदीप नंतर ऑस्ट्रेलियाहून परतलेला आणखी एक खेळाडू जखमी, रणजी ट्रॉफीला मुकणार