Ajay Jadeja on Ishan Kishan: वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकण्याचा पराक्रम करणे सोपी गोष्ट नाहीये. ही कामगिरी भारतीय क्रिकेटमध्ये फक्त 5 खेळाडूंना जमली आहे. त्यात इशान किशन या युवा फलंदाजाचाही समावेश आहे. इशान हा एक यष्टीरक्षक फलंदाज आहे. इशान त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याला यामुळेच संघात ठेवले जाते, पण सतत संघात सामील करूनही त्याला प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवला जात नाही. अशात भारतीय क्रिकेटच्या या वर्तणुकीवर माजी खेळाडू अजय जडेजा याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या मते, भारतीय क्रिकेटची ही जुनी समस्या आहे. ते खेळाडूला निवडत नाहीत, तर रिजेक्ट करतात.
संघात जागा, पण प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर
खरं तर, इशान किशन (Ishan Kishan) याला मागील अनेक मालिकांपासून तिन्ही क्रिकेट प्रकारात निवडले जात आहे. मात्र, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी खूपच कमी वेळा मिळत आहे. इशान एक सलामीवीर फलंदाज आहे, पण संघाला ज्या क्रमांकावर खेळण्याची गरज पडते, तो तिथे खेळतो. आशिया चषक स्पर्धेत श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त होता, तेव्हा इशान मधळ्या फळीत शानदार खेळला होता. त्याच्या प्रदर्शनाच्या आधारावर त्याला विश्वचषक 2023 (World Cup 2023) संघातही सामील केले होते. मात्र, काही सामन्यांमध्येच त्याला संधी दिली. शुबमन गिलचे पुनरागमन होताच, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
विश्वचषक संपल्यानंतर लगेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेचेही आयोजन झाले. यातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतही इशानला पहिल्या तीन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. मात्र, चौथ्या सामन्यात जशी श्रेयस अय्यरची एन्ट्री झाली, तसा इशान पुन्हा प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर झाला. इशानसोबत सातत्याने हा व्यवहार होत असल्यामुळे भारताचा माजी खेळाडू अजय जडेजा (Ajay Jadeja) याने तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला जडेजा?
स्पोर्ट्स तकशी बोलताना जडेजा म्हणाला, “विश्वचषकानंतर लगेच एक सीरिज झाली. इशान किशन 3 सामने खेळला आणि घरी गेला. तो खरंच एवढा थकला होता का की, तीन सामन्यानंतर त्याला आरामाची गरज पडली? त्याने तर विश्वचषकातही जास्त सामने खेळले नाहीत. विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये राहण्याचा तो हक्कदार होता. किती भारतीय खेळाडूंनी आपल्या चांगल्या दिवशी द्विशतक केले आहे. तो आपल्या डोक्याने सामना पालटू शकतो. तो केव्हा तयार होणार? तुम्ही त्याला नेहमी ट्रायलसाठी ठेवणार का? भारतीय क्रिकेटची ही समस्या आजची नाहीये, ही खूप जुनी समस्या आहे की, आम्ही खेळाडूंना सिलेक्ट नाही, तर रिजेक्ट करतो.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “इशानने ऑस्ट्रेलियाविरुद्धही 5 टी20 सामने खेळले नाहीत. त्याला 3 सामन्यांनंतर विश्रांती करण्यासाठी घरी पाठवले. जर तो पुढे खेळला असता, तर तुम्हाला कसे समजेल की, तो आता पूर्णपणे तयार आहे की नाही.”
“Hum selection nahi karte, hum rejection karte hain (we do not select, we reject).”
~ Ajay Jadeja pic.twitter.com/NUXC5Mrqik
— Cricketopia (@CricketopiaCom) December 4, 2023
इशानची मालिकेतील कामगिरी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात इशान किशन याने 39 चेंडूत 58 धावा, दुसऱ्या सामन्यात 32 चेंडूत 52 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. मात्र, तिसऱ्या सामन्यात त्याला शून्य धावसंख्येवर बाद व्हावे लागले होते. त्यानंतर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. (former cricketer ajay jadeja on ishan kishan said the problem of indian cricket is they dont select player but read here)
हेही वाचा-
अवघ्या 23व्या वर्षी बोहल्यावर चढला आफ्रिकन गोलंदाज, भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच थाटला संसार; पाहा Photos
धक्कादायक! व्यक्तीला कपड्यांमुळे मिळाली नाही विराटच्या रेस्टॉरंटमध्ये एन्ट्री, व्हिडिओ काढत सांगितलं गाऱ्हाणं