इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा किताब चेन्नई सुपर किंग्स संघाने उंचावला. आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही सीएसकेची पाचवी वेळ होती. ही ट्रॉफी जिंकण्यात सीएसकेचा विस्फोटक खेळाडू अंबाती रायुडू याने सिंहाचा वाटा उचलला होता. विशेष म्हणजे, आयपीएलच्या अंतिम सामना क्रिकेट कारकीर्दीतील अखेरचा सामना असल्याचे रायुडूने आधीच स्पष्ट केले होते. त्यानंतर आता रायुडू राजकारणाकडे वळल्याचे वृत्त आहे. रायुडूने बुधवारी (दि. 28 जून) राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली. तो त्याचे मूळ जिल्हा असलेल्या गुंटूरचा दौरा करत आहे.
लोकांची सेवा करणार रायुडू
अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याने गुंटूर जिल्ह्याच्या वट्टीचेरुकुरू विभागातील मुल्तुरू येथील दौऱ्यादरम्यान म्हटले की, तो लोकांची सेवा करण्यासाठी आंध्रप्रदेशमध्ये राजकारणात प्रवेश करण्याची योजना आखत आहे. यापूर्वी त्याने लोकांच्या भावना आणि समस्या जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांचा दौराही केला.
https://www.instagram.com/p/CuCsFHDvwHR/
मंदिरात केली विशेष पूजा
यापूर्वी रायुडूने अमीनाबाद गावातील मुलंकारेश्वरी मंदिराचा दौरा केला. इथे त्याने विशेष पूजाही केली. याव्यतिरिक्त त्याने फिरंगीपुरम येथील साई बाबा मंदिर आणि बाला येशू चर्चचा दौरा केला. मुतूलर गावाच्या यात्रेदरम्यान त्याने एका स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वादही घेतला. रायुडूने शाळेतील विद्यार्थ्यांसमोर येणाऱ्या आव्हानांबद्दल जाणून घेतले.
मुख्यमंत्र्यांशी चांगले नाते
रायुडूने अद्याप त्याच्या राजकीय नात्यांबाबत कोणताही खुलासा केला नाहीये. मात्र, त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टच्या कमेंट्समधील चर्चा आहेत की, तो वायएस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस पक्षात सामील होऊ शकतो. 19 एप्रिल रोजी रायुडूने श्रीकाकुलम जिल्ह्याच्या नौपाडात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री रेड्डी यांच्या भाषणाचे कौतुकही केले होते.
मुख्यमंत्र्यांची भेट
विशेष म्हणजे, आयपीएल 2023 हंगामाचा किताब जिंकल्यानंतर रायुडूने संघ व्यवस्थापनासोबत मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. त्याने म्हटले की, मुख्यमंत्री रेड्डी, रूपा मॅडम आणि सीएसके संघ व्यवस्थापनासोबत एक बैठक झाली. आम्ही वंचितांसाठी क्रीडा पायाभूत सुविधांचा विकास आणि शिक्षण यावर चर्चा केली.
https://www.instagram.com/p/CtOvIeeBIca/
रायुडूची आयपीएल 2023मधील कामगिरी
रायुडूने आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून एकूण 16 सामने खेळले होते. यादरम्यान त्याने 15.80च्या सरासरीने 158 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 139.82च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. (former cricketer ambati rayudu announce to join politics and will serve people)
महत्वाच्या बातम्या-
‘मला नेहमीच त्याची चिंता वाटते, तो लवकर जखमी…’, भारताच्या स्टार खेळाडूविषयी कपिल पाजींचे लक्षवेधी भाष्य
MPL फायनलवर सावट! पावसामुळे खेळ रद्द झाल्यावर कुणाला मिळाणार ट्रॉफी