भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना गुवाहाटी येथे मंगळवारी (दि. 28 नोव्हेंबर) खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड याने शानदार शतक ठोकले. शतकासह ऋतुराज ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20त शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज बनला. या मालिकेतील ऋतुराजच्या शानदार फलंदाजीविषयी बोलताना माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने मोठे विधान केले.
नेहराकडून ऋतुराजचे कौतुक
आशिष नेहरा (Ashish Nehra) म्हणाला की, चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), भारतीय संघासाठी एक तिन्ही क्रिकेट प्रकाराचा खेळाडू आहे. जिओ सिनेमाशी बोलताना नेहराने ऋतुराजचे कौतुक केले. तो म्हणाला, “यात कोणतीही शंका नाहीये की, ऋतुराज गायकवाड भारतासाठी तिन्ही क्रिकेट प्रकाराचा खेळाडू आहे. प्रत्येकाला माहितीये की, ऋतुराज कशाप्रकारचा खेळाडू आहे. जेव्हा तुम्ही यशस्वी जयसवालबद्दल बोलता, तेव्हा त्याचा खेळ ऋतुराजच्या तुलनेत पूर्णपणे वेगळा आहे. तुम्हाला टी20 क्रिकेट प्रकारातही दृढतेची गरज आहे आणि गायकवाड हेच घेऊन येतो.”
ऋतुराजने ठोकलं पहिलं टी20 शतक
तिसऱ्या टी20 सामन्यात ऋतुराजने मॅक्सवेलच्या चेंडूवर षटकार मारत 52 चेंडूत आपले पहिले शतक पूर्ण केले. अखेरच्या षटकात मॅक्सवेलने 30 धावा खर्च केल्या, त्यामुळे भारताने 20 षटकात 3 विकेट्स गमावत 222 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचे शानदार शतक हे सर्वात छोट्या क्रिकेट प्रकारात कोणत्याही भारतीयाने ठोकलेले सातवे सर्वात वेगवान शतक आहे.
ऋतुराजची फलंदाजी पाहून नेहरा म्हणाला, “ऋतुराज गायकवाडने ज्याप्रकारे सुंदरता दाखवली, ते अविश्वसनीय, अद्भुत आहे. तसेच, ही एक शानदार, चांगली आणि जबरदस्त खेळी होती.”
गुवाहाटीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराजच्या नाबाद शतकी खेळीत 7 षटकार आणि 13 चौकारांचा समावेश होता. भारतीय सलामी फलंदाज ऋतुराजने आपले पहिले टी20 शतक ठोकून 200पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. ऋतुराज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने द्विपक्षीय मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात 90.50च्या सरासरीने भारतासाठी सर्वाधिक 181 धावा केल्या आहेत. (former cricketer ashish nehras statement ruturaj gaikwad inning ind vs aus 3rd t20 match)
हेही वाचा-
साई सुदर्शनची Team India मध्ये एन्ट्री होताच अश्विनला पराकोटीचा आनंद; म्हणाला, ‘या पोराने कुठलीच…’
कसोटी-टी20 संघात संधी न मिळालेल्या चहलचे लक्षवेधी ट्वीट, फक्त चारच शब्दात म्हणाला…