सध्या सर्वत्र भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या महामुकाबल्याची चर्चा सुरू आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटू दोन्ही संघांना वेगवेगळे सल्ले देत आहेत. आता न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिस याने भारताला एक मोलाचा सल्ला दिला आहे. त्यात त्याने पाकिस्तानी फलंदाजांवर आणि संपूर्ण संघावर दबाव कसा निर्माण करता येईल हे सांगितले आहे.
भारतासाठी रणनीती सुचवताना स्टायरिस म्हणाला, “पाकिस्तानचे खालच्या क्रमातील फलंदाज फिरकीपटूंना लक्ष्य करण्यात पटाईत आहेत. ते पाकिस्तानच्या बाजूने काम करू शकते. त्यामुळे पाकिस्तानला सुरुवातीचे धक्के देणे भारतासाठी आवश्यक असेल. यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांवर दडपण येईल आणि संघाला आधार देण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडेल, जी त्यांना करायची नाही.”
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी आश्चर्यचकित झालो आहे’, विराटच्या फलंदाजीवर राशिद खानची भन्नाट प्रतिक्रिया
विराट कोहली जुन्या फॉर्ममध्ये परतला! सराव सत्रातील व्हिडिओ पाहून तुम्हीही असेच म्हणाल