---Advertisement---

स्टार्कच्या कॅचवर टीव्ही पंचांचा Not Out निर्णय, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने फटकारत म्हटले, ‘हा मोठा मूर्खपणा…’

On: रविवार, जुलै 2, 2023 2:04 PM
Glenn-McGrath
---Advertisement---

ऍशेस मालिका 2023मध्ये झेल आणि त्यावरून होत असलेला वाद थांबायचं नाव घेत नाहीये. सध्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान टीव्ही पंचांच्या निर्णयावर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ग्लेन मॅकग्राने टीव्ही पंचांना फटकारले आहे. तो म्हणाला आहे की, जर बेन डकेट नाबाद आहे, तर आतापर्यंतचे सर्व झेल नाबाद असले पाहिजेत.

काय म्हणाला मॅकग्रा?
माध्यमांशी बोलताना ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath) म्हणाला की, “मी आजपर्यंत न पाहिलेला हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. स्टार्कने चेंडूवर नियंत्रण मिळवले होते. जर तो बाद नाहीये, तर आतापर्यंत घेतलेले इतर कोणतेही झेल नाबाद असले पाहिजेत. तो चेंडू नियंत्रणात नाहीये, असे म्हणणे हास्यास्पद आहे. त्याने हा झेल दोन्ही हातांनी नियंत्रित केला आहे आणि हे सर्वांनी पाहिले आहे.”

झाले असे की, सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसरे शेवटचे (Second Last) षटक कॅमरून ग्रीन (Cameron Green) टाकत होता. यावेळी इंग्लंडचा फलंदाज बेन डकेट (Ben Duckett) याने फाईन लेगच्या दिशेने हवेत शॉट मारला. तिथे उभ्या असलेल्या मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याने डाव्या बाजूला धावात हा झेल हवेत झेप घेत पकडला. झेल घेतल्यानंतर स्टार्कने बाद असल्याचा इशारा केला. मैदानी पंचांनी फलंदाजाला बादही घोषित केले. यावेळी डकेट तंबूत परत जात होता, पण तेवढ्यात त्याला पंचांनी रोखले आणि टीव्ही पंचांकडे हा निर्णय पाठवला.

यावेळी टीव्ही पंचांनी रिप्ले पाहिल्यानंतर बेन डकेटला नाबाद घोषित केले. टीव्ही पंचांनुसार, चेंडूने जमिनीला स्पर्श केला. तसेच, रिप्लेमध्ये तसे दिसतही होते.

एमसीसीचा नियम काय सांगतो?
एमसीसी नियम (MCC Rule) 33.3 स्पष्टरीत्या सांगतो की, एक झेल तेव्हाच पूर्ण होतो, जेव्हा क्षेत्ररक्षकाचे चेंडू आणि आपल्या गतीवर पूर्ण नियंत्रण असते. मात्र, स्टार्कने झेल तर व्यवस्थित पकडला आहे, पण ज्यावेळी चेंडू जमिनीला स्पर्श झाला, तेव्हा स्टार्कने त्याचे नियंत्रण गमावले होते. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी फलंदाजाला नाबाद घोषित केले. (former cricketer glenn mcgrath slams tv umpire in mitchell starc catch controversy said this know here)

महत्वाच्या बातम्या-
ऍशेसमध्ये पुन्हा कॅच कॉन्ट्रोव्हर्सी! स्टार्कने टिपलेल्या ‘त्या’ झेलावरून माजले रणकंदन
निवृत्तीविषयी डिविलियर्सचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, ‘त्यावेळी माझ्यासाठी कुणीच नव्हते…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---