वेस्ट इंडिज संघ आयसीसी वनडे विश्वचषक 2023 क्वालिफायर फेरीतील सुपर 6च्या तिसऱ्या सामन्यात स्कॉटलंड संघाकडून पराभूत झाला होता. या सामन्यात स्कॉटलंडने 7 विकेट्सने विजय मिळवत वेस्ट इंडिजला विश्वचषकातून बाहेर काढले होते. 48 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिज संघ वनडे विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नाही. या पराभवानंतर चाहत्यांपासून ते माजी क्रिकेटपटूंपर्यंत अनेकजण निराश आहेत. अशात वेस्ट इंडिज क्रिकेटच्या सुवर्ण काळाचे साक्षीदार राहिलेल्या दोन दिग्गजांना संघ विश्वचषकासाठी पात्र न ठरल्याने दु:ख झाले आहे.
वेस्ट इंडिज (West Indies) संघाचे दिग्गज क्रिकेटपटू गॉर्डन ग्रीनिज आणि जोएल गार्नर (Gordon Greenidge and Joel Garner) यांना वनडे विश्वचषक जिंकण्याचा अनुभव कसा आहे, हे माहितीये. दोन्ही खेळाडू 1979मध्ये इंग्लंड संघाला पराभूत करत लॉर्ड्स मैदानावर विजय मिळवणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचा भाग होते. माध्यमांशी बोलताना गॉर्डन ग्रीनिज (Gordon Greenidge) म्हणाले की, “आजकाल मी जास्त क्रिकेट पाहत नाही. खासकरून मर्यादित षटकांचे क्रिकेट. आधी वेस्ट इंडिज संघ हारल्यावर खूप दु:ख व्हायचे. मात्र, आता नाही. कारण, इतक्या वर्षांमध्ये आमची पातळी घसरली आहे. वेस्ट इंडिजशिवाय विश्वचषकाची कल्पनाही करणे कठीण आहे. आता संघ पहिल्यासारखा राहिला नाहीये.”
दुसरीकडे, जोएल गार्नर (Joel Garner) यांनी म्हटले की, “आम्ही ते नाहीत, जे आधी होतो. आधी वेस्ट इंडिजसाठी खेळताना खेळाडूंना अभिमान वाटायचा. हीच आमची प्रेरणा होती. आता युवा खेळाडू टी20 लीगला महत्त्व देत आहेत. त्यांचा काहीच दोष नाही, प्रत्येकाला आर्थिक सुरक्षा हवीये.”
पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, “आमच्या पिढीला एवढा पैसा मिळत नव्हता, पैसा काऊंटी क्रिकेटमधून यायचा. मात्र, आजच्या क्रिकेटपटूंकडे पैसा कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यांना दोष दिला जाऊ शकत नाही. वेस्ट इंडिजसाठी खेळण्याचा अभिमान पुन्हा आणावा लागेल.” तसेच, गार्नर म्हणाले की, “एक योग्य तंत्र उभे करावे लागेल, जेणेकरून युवा खेळाडूंचे लक्ष आणि प्रेरणा कायम राहावी. सर्वांना हा प्रयत्न करावा लागेल, एक व्यक्ती किंवा गटाला नाही.”
वेस्ट इंडिज संघ जेव्हा 2022च्या टी20 विश्वचषक सुपर 12 फेरीत पोहोचू शकला नव्हता, तेव्हा क्रिकेट वेस्ट इंडिजचे तत्कालीन अध्यक्ष रिकी स्केरिट यांनी पूर्ण तपासणी आण बदल करण्याचे वचन दिले होते. त्यानंतरपासून फार काही बदलले नाही आणि स्केरिट निराश झाले. त्यांनी म्हटले की, “वेस्ट इंडिजला विश्वचषकात जागा न मिळवताना पाहून दु:ख होत आहे, आमचा इतका गौरवशाली इतिहास राहिला आहे आणि हे पाहणे दु:खद आहे.”
वेस्ट इंडिज संघ भारताविरुद्ध भिडणार
विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर आता वेस्ट इंडिज संघ भारताविरुद्ध दोन हात करताना दिसेल. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (West Indies vs India) संघात 12 जुलैपासून 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेनंतर उभय संघात 3 वनडे आणि 5 टी20 सामन्यांची मालिकाही खेळली जाणार आहे. (former cricketer Gordon Greenidge and Joel Garner reacts after west indies not qualify for world cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
Big Breaking : अजित आगरकरची वरिष्ठ पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड, बीसीसीआयने दिली माहिती
कोणाला मिळणार वर्ल्डकपचे लास्ट तिकीट? झिम्बाब्वेच्या पराभवानंतर असे बनले समीकरण, वाचा सविस्तर