वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताच्या वनडे आणि कसोटी संघाची घोषणा झाली आहे. डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात पराभव मिळाल्यानंतर भारतीय निवडकर्त्यांनी कठीण निर्णय घेत काही अनुभवी खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या यादीत सर्वात मोठे नाव चेतेश्वर पुजारा याचे आहे. पुजाराला संघाबाहेर करण्याचा निर्णय भारतीय संघाच्या माजी खेळाडूंना पटला नाहीये. सुनील गावसकर आणि हरभजन सिंग यांनी पुजाराला पाठिंबा दिला आहे.
काय म्हणाला हरभजन सिंग?
भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंग (Harbhajan Singh) म्हणाला की, चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) हा संघाचा कणा आहे. आशा आहे की, त्याला वगळले नसून विश्रांती दिली असेल. तो म्हणाला, “चेतेश्वर पुजारा नाहीये, यामुळे मी चिंतेत आहे. तो भारतीय संघाचा मोठा खेळाडू आहे. आशा आहे की, त्याला विश्रांती दिली असेल आणि त्याला वगळले नसेल. पुजारा या संघाचा पाठीचा कणा आहे. जर तुम्ही त्याला वगळत असाल, तर इतर फलंदाजांची सरासरीही चांगली राहिली नाहीये.”
‘प्रत्येकासाठी समान मापदंड’
“प्रत्येक खेळाडूसाठी मापदंड समान असले पाहिजेत. तो किती मोठा खेळाडू आहे, यामुळे फरक पडत नाही. जर तुम्ही पुजाराला महत्त्वाचा खेळाडू मानत नसाल, तर या लॉजिकने इतर खेळाडूही महत्त्वाचे नाहीत. त्याच्या कारकीर्दीविषयी प्रश्न उपस्थित केले गेले नाही पाहिजेत. भारताने ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली. तसेच, इंग्लंडमध्येही विजयी पताका फडकावला आणि प्रत्येक ठिकाणी जिथे संघ चांगला खेळला, तिथे पुजाराचे दमदार प्रदर्शन राहिले आहे. त्याने मागील एक-दीड वर्षात चांगले प्रदर्शन केले नाहीये, पण तुम्ही इतर फलंदाजही पाहा. अशात फक्त एका खेळाडूवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाहीये.”
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात 14 धावा आणि दुसऱ्या डावात 27 धावा केल्या होत्या. हा सामना भारतीय संघ 209 धावांनी पराभूत झाला होता. (former cricketer harbhajan singh is not happy with cheteshwar pujara out from test team for west indies tour 2023)
महत्वाच्या बातम्या-
जशी कमाई, तसा खर्च! विराटच्या नवीन घड्याळाची किंमत ऑडी कारच्या किंमतीपेक्षा जास्त, आकडा तर वाचाच
‘आता रणजी खेळणं बंद कर…’, विंडीज दौऱ्यासाठी निवडकर्त्यांकडून सरफराजकडे दुर्लक्ष, संतापले गावसकर