‘सगळे दिवस सारखे नसतात’, असे आपण अनेकदा वाचले किंवा ऐकले असेल. हे वाक्य भारतीय संघातील एका खेळाडूसाठी वापरले तर वावगे ठरणार नाही. तो खेळाडू म्हणजेच विस्फोटक फलंदाज केएल राहुल होय. राहुल मागील काही काळापासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. राहुलला नीट 30 धावांचा टप्पाही पार करताना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत होती. मात्र, आता राहुलचे दिवस बदललेत. शुक्रवारी (दि. 17 मार्च) वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यात राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयी खेळी साकारली. त्याच्या खेळीमुळे भारताचा विजय आणखी सोपा झाला. आता त्याच्या कामगिरीसाठी त्याच्यावर सर्व बाजूंनी कौतुकाचा पाऊस पडत आहे.
विशेष म्हणजे, कसोटी मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात केएल राहुल (KL Rahul) याने खराब कामगिरी केली होती. त्यामुळे त्याच्याकडून उपकर्णधारपदही काढून घेण्यात आले होते. त्यानंतर त्याला उर्वरित दोन कसोटी सामन्यातूनही बाहेर काढले होते. मात्र, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील पहिल्या कसोटी सामन्यात वादळी अर्धशतक ठोकत त्याने टीकाकारांची बोलती बंद केली आहे. राहुलने नाबाद 75 धावांची खेळी साकारली. त्याने सहाव्या विकेटसाठी रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्यासोबत नाबाद 108 धावांची भागीदारी रचली. आता सोशल मीडियावर राहुलच्या कौतुकाचे पूल बांधले जात आहेत.
भारतीय संघाच्या शानदार विजयानंतर भारताचा माजी दिग्गज खेळाडू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने ट्वीट केले. त्यात त्याने लिहिले की, “बोललो होतो ना, पठ्ठ्यामध्ये दम आहे. खूप छान केएल राहुल. भारतासाठी तुला धावा करताना आणि पहिला वनडे जिंकताना पाहून चांगले वाटले. जडेजाने बॅट आणि बॉलमधून चांगली कामगिरी केली. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजनेही शाानदार गोलंदाजी केली.”
Bola tha na bandhe mai hai Dum well done @klrahul good to see you scoring runs and winning the first odi for team India 🇮🇳 way to go 👍 Top stuff Jadeja with the ball and bat… well bowled @MdShami11 @mdsirajofficial @imjadeja pic.twitter.com/9ALZWXS997
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) March 17, 2023
त्याच्यानंतर भारताचा माजी विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) म्हणाला की, “शेवट चांगला, तर सर्व चांगलं. जड्डूची शानदार अष्टपैलू कामगिरी आणि केएल राहुलची लाजवाब खेळी.”
Any bhala toh sab bhala.
Great all round show by Jaddu and top knock from KL Rahul. #INDvsAUS pic.twitter.com/npoS1E1zaS— Virender Sehwag (@virendersehwag) March 17, 2023
इतर भारतीय खेळाडूंनीही विजयानंतर भारताचे आणि खेळाडूंचे कौतुक केले.
Great teams are built on trust. Rohit Sharma and Rahul Dravid showed faith, KL Rahul proves they were not wrong. @klrahul pic.twitter.com/Zpv25lOPSr
— Mohammad Kaif (@MohammadKaif) March 17, 2023
Superb game awareness and composure from these two under pressure. Well played @klrahul & @imjadeja 👏🏽👏🏽 #INDvAUS pic.twitter.com/JbglgYacsb
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) March 17, 2023
A very impressive win from Team India. The bowlers were brilliant to get Australia all out for 188 after they were 129/2 before the 20 overs# and in the run chase KL Rahul’s composure under pressure was the key and that partnership with Jadeja was spectacular. #IndvsAus pic.twitter.com/8K4pKKrnZy
— VVS Laxman (@VVSLaxman281) March 17, 2023
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताने शमी आणि सिराजच्या प्रत्येकी 3 विकेट्सच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 35.4 षटकात सर्वबाद करत 188 धावांवरच गुंडाळले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. भारताने झटपट विकेट्स गमावल्या. सूर्यकुमार यादव, विराट कोहली यांसारख्या विस्फोटक खेळाडूंना 5 धावाही करता आल्या नाहीत. मात्र, त्यानंतर राहुल (नाबाद 75) आणि जडेजाने (नाबाद 45) सहाव्या विकेटसाठी 108 धावांची विजयी भागीदारी रचली. तसेच, 39.5 षटकात 5 विकेट्स गमावत 191 धावा चोपल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे, जडेजाने गोलंदाजी करताना दोन विकेट्सही चटकावल्या. त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. (former cricketer harbhajan singh praised kl rahul after india vs australia 1st odi match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘सामनावीर’ पुरस्कार पटकावताच जडेजाचे मन जिंकणारे विधान; म्हणाला, ‘मी 8 महिन्यानंतर…’
राहुलने गाजवली मुंबई वनडे! नाबाद खेळीसह मोडला धोनीचा ‘महापराक्रम’