कसोटी सामना असो टी20 सामना असो किंवा वनडे क्रिकेट सामना असो, भारतीय संघ सध्या प्रत्येक प्रकारात धमाल कामगिरी करताना दिसत आहे. आधी भारताने ऑस्ट्रेलियाला 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1ने पराभूत केले. त्यानंतर 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात शुक्रवारी (दि. 17 मार्च) ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सने नमवले. भारताच्या या विजयात रवींद्र जडेजा याचा मोलाचा वाटा होता. त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही क्षेत्रात कमाल दाखवली. रवींद्र जडेजाची अष्टपैलू कामगिरी विरोधकांवर अशी भारी पडली की, त्याने थेट सामनावीर पुरस्कार आपल्या नावावर केला. सामनावीर बनल्यानंतर जडेजाने त्याच्या कामगिरीविषयी भाष्य केले.
काय म्हणाला रवींद्र जडेजा?
सामनावीर रवींद्र जडेजा (Player of The Match Ravindra Jadeja) याने सामन्यानंतर आपल्या पुनरागमनाबद्दल भाष्य केले. तो म्हणाला की, “मी 8 महिन्यांनंतर वनडे क्रिकेट खेळत आहे. आता लवकरात लवकर या क्रिकेट प्रकारात मिसळण्याचा प्रयत्न करत होतो. सुदैवाने मला दोन विकेट्स मिळाल्या आणि बॅटमधूनही केएल राहुलसोबत भागीदारी केली.”
1⃣ Brilliant catch
2⃣ Wickets
4⃣5⃣* RunsFor his superb all-round performance, @imjadeja bags the Player of the Match award as #TeamIndia beat Australia in the first #INDvAUS ODI 🙌 🙌
Scorecard ▶️ https://t.co/BAvv2E8K6h @mastercardindia pic.twitter.com/xaPDmpRX0p
— BCCI (@BCCI) March 17, 2023
पुढे बोलताना तो म्हणाला की, “आम्ही यापूर्वी कसोटी क्रिकेट खेळत होतो, त्यामुळे वनडे सामन्यात लाईन आणि लेंथ वेगळी असते. तुम्ही एका गतीने गोलंदाजी करू शकत नाही. मी फक्त चांगल्या भागात गोलंदाजी करू इच्छित होतो. तसेच, मला थोडे वळणही मिळत होते. त्यामुळे मी विचार केला की, मला योग्य एरियामध्ये गोलंदाजी करण्याची गरज आहे आणि खेळपट्टी बाकीचं काम करेल.”
खरं तर, कसोटी मालिकेतही जडेजाने कौतुकास्पद कामगिरी केली होती. पहिल्या दोन कसोटीत जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तसेच, कसोटी मालिकेच्या शेवटी त्याला आर अश्विन याच्यासोबत मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कसोटी मालिकेतील फॉर्म त्याने वनडे मालिकेतही कायम ठेवला आहे. तसेच, बॅट आणि चेंडू अशा दोन्ही विभागात त्याने चमकदार कामगिरी केली आहे. सामन्यातील जडेजाच्या गोलंदाजीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 9 षटके गोलंदाजी करताना 46 धावा देत 2 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, फलंदाजी करताना त्याने 69 चेंडूत 45 धावांची नाबाद खेळीही साकारली. या धावा करताना त्याने 5 चौकारांचाही पाऊस पाडला.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील दुसरा वनडे सामना रविवारी (दि. 19 मार्च) विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. (ind vs aus player of the match ravindra jadeja on his all round performence read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राहुलने गाजवली मुंबई वनडे! नाबाद खेळीसह मोडला धोनीचा ‘महापराक्रम’
विराटची ‘चेस मास्टर’ ओळख पुसली जातेय! वनडेत 20 चा आकडा गाठणे ही झालेय कठीण