भारतीय संघाचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दारुण पराभव झाला. या पराभवानंतर भारतीय दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने एमएस धोनी आणि त्याच्या चाहत्यावर टीकास्त्र डागले. खरं तर, सलग दुसरा डब्ल्यूटीसी अंतिम सामना गमावल्यानंतर ट्विटरवर भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी ट्रेंड झाला होता. ट्रेंड होण्यामागील कारण आयसीसी ट्रॉफी होते.
भारतीय संघाने एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक आणि शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. तसेच, अनेक क्रिकेटपटूंनीही धोनीविषयी भाष्य केले होते की, त्याने आयसीसी ट्रॉफी जिंकणे जितके सोपे केले होते, तितके सोपे नाहीये. अशात, एका ट्विटर युजरने धोनीची प्रशंसा करतानाच हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने त्या चाहत्यावर निराशा साधत आपला राग व्यक्त केला.
काय म्हणाला चाहता?
एका चाहत्याने ट्वीट करत लिहिले की, “कोणताही कोच नाही, कुणी मार्गदर्शक नाही, युवा खेळाडू, अनेक वरिष्ठ खेळाडूंनी भाग घेण्यास नकार दिला. यापूर्वी कधीही एकाही सामन्यात नेतृत्व केले नाही. या माणसाने उपांत्य सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आणि कर्णधार बनल्यानंतर 48 दिवसात टी20 विश्वचषक जिंकला.”
No coach , no mentor , young boy’s , most of the senior player’s denied to take part . never captianed any single match before . This guy defeated prime australia in semifinals and won a T20 World Cup in 48 day’s after becoming captain . pic.twitter.com/6YbCB5nwcz
— ????????????????????????????????????????????????????™ (@Itzshreyas07) June 11, 2023
हरभजनची प्रतिक्रिया
हरभजन सिंग याने ट्वीट रिट्विट करत लिहिले की, “होय,, जेव्हा हे सामने खेळले गेले, तेव्हा हा युवा खेळाडू भारताकडून एकटा खेळत होता. इतर 10 नाही. त्याने एकट्यानेच विश्वचषक ट्रॉफी जिंकल्या. महत्त्वाचं म्हणजे, जेव्हा ऑस्ट्रेलिया किंवा इतर देश विश्वचषक जिंकतो, तेव्हा चर्चा असते की, ऑस्ट्रेलिया किंवा इतर देशाने जिंकला, पण जेव्हा भारत जिंकतो, तेव्हा म्हटले जाते की, कर्णधार जिंकला. हा एक सांघिक खेळ आहे. यामध्ये एकसोबत जिंकतात आणि एकसोबत हारतात.”
Yes when these matches were played this young boy was playing alone from india.. not the other 10 .. so alone he won the World Cup trophies .. irony when Australia or any other nation win the World Cup headlines says Australia or etc country won. But when indian wins it’s said… https://t.co/pFaxjkXkWV
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) June 11, 2023
भारता त जेव्हाही आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची चर्चा होते, तेव्हा नेहमी कर्णधारांचे नाव सर्वप्रथम येते. त्यामुळे 2007 आणि 2011 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावणारा गौतम गंभीर (Gautam Gambhir) नेहमी निराश होतो.
खरं तर, एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला आयसीसी किताब 2007च्या टी20 विश्वचषकाच्या रूपात जिंकला होता. त्यानंतर 2011च्या वनडे विश्वचषकातही विजय मिळवून भारताने 28 वर्षांचा वनवास संपवला होता. यानंतर दोन वर्षांनी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवरही आपले नाव कोरले होते. 2013नंतर भारत अनेकदा आयसीसी ट्रॉफीच्या अंतम सामन्यात पोहोचला, पण त्यांना विजय मिळवताच आला नाही. (former cricketer harbhajan singh taunted ms dhoni said this read here)
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या पराभवामागील खरे व्हिलन ‘हे’ 2 खेळाडू! नेटकरीही म्हणाले, ‘बीसीसीआयने त्यांना घेतलंच कशाला?’
WTC फायनलचा पराभव विराटच्या जिव्हारी, एक शब्दही न बोलण्याचा घेतला निर्णय; स्टोरी पाहून व्हाल भावूक