क्रीडाविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाकिस्तानचे माजी दिग्गज खेळाडू इम्रान खान यांना अटक करण्यात आले आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान असलेल्या इम्रान यांना इस्लामाबादच्या उच्च न्यायालयाबाहेर अटक झाली आहे. इम्रान खान यांच्या अटकेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये पाकिस्तान रेंजर्स त्यांना ओढत घेऊन जाताना दिसत आहेत.
राजकारणात सक्रिय असणाऱ्या इम्रान खान हे पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाचे अध्यक्ष आहेत. अशात त्यांच्या या पक्षाने इम्रान यांच्या अटकेला ‘अपहरण’ म्हटले आहे.
पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) के अध्यक्ष और पाकिस्तान के पूर्व प्रधानमंत्री इमरान खान को इस्लामाबाद हाई कोर्ट के बाहर गिरफ़्तार किया गया: डॉन न्यूज़ पाकिस्तान pic.twitter.com/pRhL7OSvJ7
— ANI_HindiNews (@AHindinews) May 9, 2023
पीटीआयने ट्वीट करत म्हटले की, “पाकिस्तान रेंजर्सने पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांचे अपहरण केले आहे.” पीटीआयने असाही दावा केला आहे की, अटक करताना इम्रान खान यांना पाकिस्तानी रेंजर्सनी धक्काही मारला, ज्यामुळे ते दुखापतग्रस्त झाले.
इम्रान खान यांना अटक (Imran Khan Arrest) होताना उच्च न्यायालयाच्या परिसरात चेंगराचेंगरीची परिस्थिती झाली. दरम्यान अनेकांना दुखापतीही झाल्याच्या बातम्या आल्या. पाकिस्तानचे माजी सूचना मंत्री आणि पीटीआयचे उपाध्यक्ष फवाद चौधरी म्हणाले की, “न्यायालयावर ‘रेंजर्सचा ताबा’ आहे. तसेच, “वकिलांवर छळ होत आहे.” पुढे ते असेही म्हणाले की, “इम्रान खान यांच्या गाडीभोवती घेराव घालण्यात आला आहे.”
‘इम्रान खान यांना मारहाण करतायेत रेंजर्स’
पीटीआयचे नेते अजहर मसवानी यांनीही आरोप लावला आहे की, रेंजर्सने न्यायालयाच्या आत 70 वर्षीय इम्रान खान यांचे ‘अपहरण’ केले. त्यांनी म्हटले की, पक्षाने देशभरात आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. तसेस, पक्षाच्या आणखी एका नेत्याने ट्विटवरवर व्हिडिओ शेअर करत म्हटले की, “ते इम्रान खान यांचा छळ करत आहेत. ते खान साहेबांना मारत आहेत. त्यांनी खान साहेबांसोबत काहीतरी केले आहे.”
इस्लामाबाद पोलिसांकडून शहरात कलम 144
दुसरीकडे, माजी पंतप्रधानांच्या अटकेवर इस्लामाबाद पोलिसांनी ट्वीट करत सांगितले की, “इम्रान खान यांना कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तसेच, परिस्थिती सामान्य आहे.” पोलिसांनी असेही सांगितले की, “शहरात कलम 144 लागू करण्यात आली आहे. तसेच, उल्लंघनांतर्गत कारवाई केली जाईल.”
इम्रान खान यांची क्रिकेट कारकीर्द
पाकिस्तानचे माजी कर्णधार राहिलेल्या इम्रान खान यांनी पाकिस्तानकडून एकूण 88 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी 37.69च्या सरासरीने 3807 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 शतके आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त्त त्यांनी गोलंदाजी करताना कसोटीत 2.66च्या इकॉनॉमी रेटने 362 विकेट्सही घेतल्या आहेत. दुसरीकडे, त्यांनी 175 वनडे सामने खेळताना 33.41च्या सरासरीने 3709 धावा केल्या आहेत. वनडेत त्यांनी 3.9च्या इकॉनॉमी रेटने 182 विकेट्स घेतल्या आहेत. (former cricketer imran khan arrested outside islamabad court by pakistan rangers see viral video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘गोलंदाजाला कुणी बोललं तर राग…’, फिल सॉल्टशी झालेल्या बाचाबाचीवर सिराजचा मोठा खुलासा
धोनीच्या IPL निवृत्तीबाबत सुरेश रैनाचा खळबळजनक गौप्यस्फोट; वाचून CSK फॅन्सही होतील खूपच खुश






