Irfan Pathan’s Playing 11, INDvsSA 1st Test: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 26 डिसेंबरपासून 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळला जाणार आहे. या सामन्याच्या काही तासांपूर्वीच भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाणने पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन निवडली. त्याने निवडलेल्या या संघात रोहित शर्मा याच्यासोबत यशस्वी जयसवाल याला सलामी फलंदाज म्हणून सामील केले आहे. तसेच, एका मॅचविनर खेळाडूला संघातून बाहेर ठेवले आहे.
मॅचविनर संघातून बाहेर
इरफान पठाण (Irfan Pathan) याने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याला सामील केले नाहीये. त्याच्या जागी इरफानने शार्दुल ठाकूर याला निवडले आहे. खरं तर, अश्विनविषयी अशा चर्चा सुरू आहेत की, त्याला खेळवले पाहिजे की नाही. दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनीही त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अश्विनला निवडले होते. मात्र, त्याला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मुकेशच्या जागी कृष्णाला जागा
इरफानने याच वर्षी भारतासाठी पदार्पण करणाऱ्या वेगवान गोलंदाज मुकेश कुमार (Mukesh Kumar) याच्या जागी प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) याला आपल्या संघात जागा दिली आहे. तसेच, कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत त्याने यशस्वी जयसवालला सलामीला निवडले आहे. तिसऱ्या स्थानी शुबमन गिल आहे. चौथ्या स्थानी विराट कोहली, तर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केएल राहुलला निवडले आहे.
Test cricket ❤️ My INDIAN playing 11 for this test match
1) Rohit Sharma
2) Yashasvi Jaiswal
3) Shubman Gill
4) Virat Kohli
5) KL Rahul (wk)
6) Shreyas Iyer
7) Ravindra Jadeja
8) Shardul Thakur
9) Jasprit Bumrah
10) Mohammed Siraj
11) Prasidh Krishna #INDvSA… pic.twitter.com/rj9FLpiIdA— Irfan Pathan (@IrfanPathan) December 26, 2023
याव्यतिरिक्त सहाव्या आणि सातव्या स्थानी अनुक्रमे श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा यांना घेतले आहे. आठवे नाव शार्दुल ठाकूर याचे आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये त्याने जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांची निवड केली आहे.
इरफान पठाणची प्लेइंग इलेव्हन (Irfan Pathan’s Playing 11)
रोहित शर्मा, यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा. (former cricketer irfan pathan selected their indian playing 11 vs south africa 1st test match ind vs sa centurion test)
हेही वाचा-
‘शमीला मिस केले जाईल, पण दोन युवा गोलंदाजांकडे मोठी संधी…’, माजी दिग्गजाचे INDvsSA कसोटीपूर्वी मोठे भाष्य
‘मला एका डोळ्याने कमी दिसत होतं…’, शाकिबने सांगितले वर्ल्डकपमधील खराब प्रदर्शनामागील धक्कादायक कारण