क्रिकेटमधून आनंदाची बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिका संघाचा 47 वर्षीय माजी खेळाडू जॅक कॅलिस याला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. बुधवारी (दि. 19 एप्रिल) कॅलिस दुसऱ्यांदा वडील बनला. जगभरातील महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणल्या जाणाऱ्या कॅलिसने ही गोड बातमी त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यासोबतच त्याने नवजात मुलीचा आणि पत्नी चार्लेन एंगेल्स हिचाही फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे, त्याने मुलीचे नावही सांगितले आहे.
जॅक कॅलिस पोस्ट
जॅक कॅलिस (Jacques Kallis) याने हे फोटो शेअर करत लिहिले की, “आज सकाळी 8.37 मिनिटांनी आमची सुंदर मुलगी क्लो ग्रेस कॅलिस हिचा जन्म झाला. 2.88 किलोग्रॅम वजनाच्या आमच्या राजकुमारीने आधीच वडिलांना आपल्या छोट्या बोटांमध्ये लपटले. आई आणि मुलगी दोघीही सुखरुप आहेत. जोशीला तिची छोटी बहीण खूपच प्रेमळ वाटली. आमचे हृदय आनंदाने धडधडत आहे.”
Introducing our beautiful baby girl, Chloé Grace Kallis, born this morning at 08:37. Our tiny little princess weighing in at 2.88kg already got Daddy wrapped around her little finger. Mom & baby doing well and Joshy is loving his little sister. Our hearts are exploding! pic.twitter.com/2SHlDFgWet
— Jacques Kallis (@jacqueskallis75) April 19, 2023
कॅलिसच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच आजी-माजी क्रिकेटपटूंनीही कमेंट्स करत अभिनंदानाचा वर्षाव केला आहे. यामध्ये युवराज सिंग, पॉल कॉलिंगवूड, डेविड मिलर यांचा समावेश आहे. युवराज ट्वीट करत म्हणाला की, “अभिनंदन सर जॅक.”
Congratulations sir jacq !!❤️
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) April 19, 2023
याव्यतिरिक्त कॉलिंगवूड म्हणाला की, “अभिनंदन सर्वकालीन सर्वोत्तम. आनंदाची बातमी. कॉलिंगवूड्सकडून खूप प्रेम.” तसेच, मिलरने कमेंट करत लिहिले की, “तुमचे अभिनंदन.” यापूर्वी 2020मध्ये कॅलिस पहिल्यांदा वडील बनला होता. त्यावेळी त्यांना जोशुआच्या रूपात मुलगा झाला होता.
https://www.instagram.com/p/CrOHUVvNi2F/
कॅलिसची कारकीर्द
जागतिक क्रिकेटमध्ये कॅलिसची गणना महान फलंदाजांसोबतच महान अष्टपैलू खेळाडूंमध्येही होते. त्याने तिन्ही क्रिकेट प्रकारात शानदार कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत 166 कसोटी सामन्यात 55.37च्या सरासरीने एकूण 13289 धावा केल्या आहेत. यामध्ये 45 शतके आणि 58 अर्धशतकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त कॅलिसच्या नावावर 292 विकेट्सचाही समावेश आहे.
त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी 328 वनडे सामनेही खेळले आहेत. त्यात त्याने 44.36च्या सरासरीने 11,579 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 17 शतके आणि 86 अर्धशतके निघाली आहेत. याव्यतिरिक्त त्याने टी20 क्रिकेटमध्येही धमाल केली आहे. त्याने 25 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 35.05च्या सरासरीने 666 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, कॅलिस आयपीएलमध्येही खेळला आहे. त्याने 98 आयपीएल सामन्यात खेळताना 28.55च्या सरासरीने 2427 धावा केल्या आहेत. तसेच, गोलंदाजी करताना 65 विकेट्सही घेतल्या आहेत. (former cricketer jacques kallis his wife charlene engels have been blessed with a baby girl)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धसमुसळ्या फलंदाजीने राजस्थानचा पराभव! लखनऊचा 155 धावांचा बचाव करत 10 धावांनी विजय
धक्कादायक! दोन महिन्यांपूर्वीच पदार्पण केलेल्या खेळाडूची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती, ठोकलेले एकमेव सामन्यात शतक