मागील काही दिवसांपूर्वी झालेले आयपीएल 2024 रिटेन्शन आणि ट्रेड चांगलेच गाजले. हार्दिक पंड्या गुजरात टायटन्स संघातून बाहेर पडत मुंबई इंडियन्स संघात परतला. यामुळे याची चांगलीच चर्चा झाली होती. यानंतर जसप्रीत बुमराह याने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले. अशात बीसीसीआयचे माजी निवडकर्ते के श्रीकांत यांनी बुमराहच्या इंस्टाग्रामवर स्टोरीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
के श्रीकांत (K Srikkanth) यांनी म्हटले की, आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेपूर्वी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात परतल्यामुळे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला दु:ख झाले असेल. बुमराहने अलीकडेच इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. त्यात त्याने लिहिले होते की, “शांतता, कधीही सर्वात चांगले उत्तर असते.” यानंतर चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा झाली.
श्रीकांत यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर म्हटले की, “तुम्हाला जसप्रीत बुमराहसारखा दुसरा क्रिकेटपटू मिळू शकत नाही. कसोटी असो किंवा मर्यादित षटकांचे क्रिकेट, तो सर्वोत्तम आहे. त्यालाही वाटत असेल की, तो मुंबईसोबत थांबला आहे, पण फ्रँचायझी आता अशा एका व्यक्तीचे जल्लोष साजरा करत आहे, जो निघून गेला आणि परत आला.”
रवींद्र जडेजाशी केली तुलना
श्रीकांत यांनी मुंबईच्या जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या स्थितीची तुलना चेन्नई सुपर किंग्स संघाचा खेळाडू रवींद्र जडेजाशी केली. तसेच, विश्वास व्यक्त केला की, संघ व्यवस्थापन या मुद्द्यावर तोडगा काढेल. त्यांनी बुमराहबद्दल सहानुभूती व्यक्त करत म्हटले की, अशा स्थितीत कोणताही खेळाडूला वाईट वाटेल.
‘काही ना काही घडले असेल’
श्रीकांत म्हणाले की, “सीएसकेमध्ये रवींद्र जडेजासोबतही काही असेच झाले होते. मात्र, संघ व्यवस्थापन आणि कर्णधाराने पुढे येऊन सर्वकाही मिटवले. माझ्या मते, काय होईल… मला विश्वास आहे की, संघ व्यवस्थापन पंड्या, बुमराहसह बसतील. रोहित आणखी गोष्टी सोडवेल. हार्दिक पंड्याच्या पुनरागमनानंतर, बुमराह विचार करत असेल की, मी त्या संघाचे नेतृत्व करू शकत होतो. जर तो नाराज असेल, तर निश्चित आहे की, काही ना काही नक्कीच घडले असेल.”
कधी केले होते पदार्पण?
जसप्रीत बुमराह 2015मध्ये आयपीएल पदार्पणानंतर मुंबई इंडियन्सचा एक अविभाजित भाग आहे. त्याने 4 किताब जिंकून देण्यात योगदान दिले आहे. त्याने यादरम्यान 120 सामन्यात गोलंदाजी करताना 145 विकेट्स घेतल्या आहेत. (former cricketer k srikkanth said jasprit bumrah may have been hurt by hardik pandya transfer to mi)
हेही वाचा-
T20 World Cup 2024 स्पर्धेत खेळणार रोहित आणि विराट? दिग्गज म्हणाला, ‘IPLमधून…’
‘रोहितच्या जागी मी कर्णधार असतो, तर 100 वेळा…’, WC Finalमध्ये संघात जागा न मिळण्याबद्दल अश्विनचे भाष्य