भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन 2 वर्षे उलटली आहेत. मात्र, तरीही त्याची लोकप्रियता किंचीतही कमी झाली नाहीये. धोनीची गणना भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये होते. त्याच्या नेतृत्वात भारताने आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकल्या आहेत. सोशल मीडियावर नेहमीच धोनी झळकताना दिसतो. अशात त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने त्याच्या आयडलचा म्हणजेच आदर्श व्यक्तीचा खुलासा केला आहे. कोण आहे तो खेळाडू चला जाणून घेऊया.
सचिन आहे एमएस धोनीचा आदर्श
प्रत्येक तरुण खेळाडूसाठी माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) हा आदर्श आहे. तसेच, त्यांना धोनीसारखे बनायचे आहे. मात्र, एमएस धोनी याचाही एक खेळाडू आदर्श आहे. तो खेळाडू इतर कुणी नसून ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा आहे. धोनीला सचिनसारखे खेळायचे होते, पण ते शक्य झाले नसल्याचे तो सांगतो.
काय म्हणाला धोनी?
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) शेअर केला आहे. हा व्हिडिओ एका शाळेतील कार्यक्रमातील आहे. या व्हिडिओत धोनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहे. भारतीय माजी कर्णधार एमएस धोनी याने एका प्रश्नाचे उत्तर देत सचिन तेंडुलकर याला आपला आदर्श म्हटले. धोनी म्हणाला की, “सचिन तेंडुलकर माझ्यासाठी क्रिकेटचा आदर्श आहे. प्रत्येक भारतीयाप्रमाणे, जेव्हाही मी सचिन तेंडुलकरची फलंदाजी पाहायचो, तेव्हा मला त्याच्यासारखेच खेळायचे होते. मात्र, नंतर मला समजले की, मी त्याच्यासारखा खेळू शकत नाही. तरीही, माझ्या मनात नेहमी तेच होते. मी नेहमीच त्याच्यासारखे खेळण्याचे स्वप्न पाहायचो.”
Even Thala’s favourite period is PT! 😉#WhistlePodu #Yellove 🦁💛 @msdhoni pic.twitter.com/t4MInuQhxu
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 13, 2022
टेनिस कोर्टवर एकत्र दिसले होते दिग्गज
विशेष म्हणजे, नुकतेच एमएस धोनी आणि सचिन तेंडुलकर हे टेनिस कोर्टवर एकत्र दिसले होते. मात्र, ते तिथे टेनिस खेळत नव्हते, तर एका जाहिरातीसाठी तिथे पोहोचले होते. त्यांच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर धोनी आयपीएल 2023मध्ये खेळताना दिसणार आहे. तसेच, सचिन तेंडुलकर रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचा भाग होता. तसेच, त्याने कर्णधार म्हणून आपल्या इंडिया लिजेंड्स संघाला विजेतेपदही मिळवून दिले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानला पराभूत करत मिळवले फायनलचे तिकीट, आनंदाच्या भरात मैदानातच नाचू लागल्या श्रीलंकन महिला
‘त्याच्याविरुद्ध खेळताना विचारच करू नका’, गंभीरचा भारतीय फलंदाजांना सल्ला