जेव्हाही जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांबद्दल चर्चा केली जाईल, तेव्हा एमएस धोनी हे नाव आपसुकच सर्वांच्या तोंडात आल्याशिवाय राहणार नाही. धोनीने भारतीय संघाला एक नाही, तर तीन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. धोनीची गणना जगभरातील दिग्गज खेळाडूंमध्ये होते. धोनीने 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याच्या निवृत्तीला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, तरीही त्याच्या चाहत्यांची संख्या कमी झाली नाही. त्याचे चाहते त्याला मैदानावर आणि मैदानाबाहेर एकसारखेच पसंत करतात. आता धोनीबाबत महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
भारतीय क्रिकेट आणि देशासाठी दिलेल्या सेवांमध्ये एमएस धोनी (MS Dhoni) याचे योगदान अनन्यासाधारण आहे. त्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. आता त्याचा पुन्हा एकदा सन्मान करण्यात आला आहे. हा सन्मान आगळ्यावेगळ्या ढंगात झाला आहे. धोनीच्या सन्मानार्थ म्हैसूरच्या एका संग्रहालयात धोनीच्या मेणबत्तीच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. याचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये चामुंडेश्वरी व्हॅक्स म्युझिअमने धोनीच्या मेणबत्तीचा पुतळ्याचे (MS Dhoni Wax Statue) अनावरण केले आहे.
मात्र, हा पुतळा पाहिल्यानंतर चाहते वेगवेगळ्या प्रकारच्या मीम्समार्फत आपल्या भावना व्यक्त करत आहेत. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, हा धोनीसारखा दिसणारा पुतळा नाहीये. विशेष म्हणजे, धोनीच्या मेणबत्तीच्या पुतळ्याची तुलना पाकिस्तानी खेळाडूंशीही केली आहे. एकाने लिहिले आहे की, “भारतीय जर्सीतील शोएब मलिकचा फोटो. फक्त हेअरस्टाईल वेगळी आहे.”
Shoaib malik in indian cricket team jersey with diffrent hair style https://t.co/wMhx8SDFKC
— muhammad huzaifa (@HarRyMa52256977) October 7, 2022
दुसऱ्या एकाने म्हटले की, “धोनीचा हा पुतळा बनवणाऱ्या कलाकारानेच आदिपुरुष सिनेमाचे व्हीएफएक्स बनवले आहेत.”
The artist who made this statue is the same who created VFX for Adipurush
— Sagar (@sagarcasm) October 7, 2022
एमएस धोनी याच्याबद्दल बोलायचं झालं, तर तो सध्या वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाग घेताना दिसतो. तो मागील महिन्यात गुरुग्राम येथे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांच्यासोबत गोल्फ खेळतानाही दिसला होता. दोघांनी न्यूयॉर्कमध्ये एकत्र 2022 यूएस ओपनमध्येही भाग घेतला होता.
एमएस धोनीच्या कारकिर्दीवर एक नजर
धोनीने 15 ऑगस्ट, 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने 90 कसोटी सामने, 350 वनडे सामने आणि 98 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 38.09च्या सरासरीने 4876 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 6 शतके आणि 33 अर्धशतके ठोकली आहेत. वनडेत त्याने 50.57च्या सरासरीने 10773 धावा केल्या आहेत. वनडेत त्याने 10 शतके आणि 73 अर्धशतके ठोकली आहेत, तर आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 37.60च्या सरासरीने 1617 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 2 अर्धशतके केली आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बुमराहनंतर आता दीपक चाहरलाही झाली दुखापत, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर होणार?
दिप्तीच्या मंकडींग प्रकरणावर न्यूझीलंड क्रिकेटरची प्रतिक्रिया; म्हणतेय, ‘ते नियमात, पण मी अजिबात…’






