महाराष्ट्राचे माजी मध्यमगती गोलंदाज आणि मामासाहेब मोहोळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदानंद मोहोळ यांचे रविवारी (३१ जुलै) वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र कुस्तीचे महर्षी म्हटले जाणारे स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांचे पुत्र तर, माजी खासदार अशोक मोहोळ यांचे बंधू होत.
मोहोळ यांनी १९६० ते १९७१ या कालावधीत क्रिकेटपटू म्हणून आपली कारकीर्द घडविली. उजव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करणाऱ्या मोहोळ यांचा १९७६ मध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात समावेश झाला होता. मात्र, त्यावेळी संघात अधिक फिरकीपटूंना संधी मिळत असल्याने त्यांना कसोटी पदार्पण करता आले नव्हते. ते उजव्या हाताचे मध्यमगती गोलंदाज होते. १९५९-६० च्या रणजी हंगामात त्यांनी गुजरातविरुद्धच्या सामन्यातून महाराष्ट्राच्या रणजी संघात पदार्पण केले. १९७१ पर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. आपल्या कारकीर्दीत ४५ प्रथमश्रेणी सामन्यात १६५ बळी मिळवले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
आता होणार बॅझबॉल क्रिकेटचा धमाका! मॅक्यूलम बंधू घडवणार जगभरात तुफानी क्रिकेटर्स
“आयपीएलमुळेच मी यशस्वी खेळाडू”; शाकीबची प्रांजळ कबुली
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी लीग खेळण्यावर आली मोठी अपडेट; वाचा सविस्तर