---Advertisement---

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये ‘हे’ भारतीय खेळाडू ठरतील गेमचेंजर; दिग्गजाने वर्तवला अंदाज

On: शनिवार, मे 15, 2021 7:46 AM
---Advertisement---

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आता काही मोजकेच दिवस बाकी आहेत. यापूर्वी अनेक क्रिकेट पंडितांनी त्यांची मते व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. माजी भारतीय फलंदाज संजय मांजरेकर यांनी न्यूझीलंडला या सामन्यात विजयाचा दावेदार घोषित केले आहे. पण त्यांनी स्पष्ट केले आहे की भारतीय कर्णधार विराट कोहली आणि युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हे या सामन्यात गेमचेंजर ठरू शकतात.

मांजरेकर यांच्या मते, भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील हा महत्त्वाचा सामना साउथम्पटन येथे खेळला जाणार आहे. साउथम्पटनची परिस्थिती न्यूझीलंडशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघ भारतावर दबाव बनवू शकतो. त्याचप्रमाणे त्यांनी भारतीय संघातील 3 फलंदाजांना या सामन्याचे गेमचेंजर म्हणून घोषित केले आहे. हिंदुस्तान टाईम्समध्ये लिहिलेल्या त्यांच्या कॉलममध्ये त्यांनी चेतेश्वर पुजाराचा उल्लेख योद्धा म्हणून केला आहे. तसेच त्यांनी भारतीय कर्णधार विराट कोहलीही गेमचेंजर असल्याचे लिहिले आहे.

मांजरेकर यांनी लिहिले, ‘पुजारा पुन्हा एकदा भारतासाठी योद्धा ठरणार आहे. जो विरोधी संघाला थकवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसेल. तो भारताच्या विजयाचा पाया रचण्याचे काम करेल. जर सुरुवातीलाच बाबी आव्हानात्मक ठरल्या तर विराट बॅटसह गेमचेंजर ठरेल. यानंतर रिषभ पंत भारतीय संघाचा गेमचेंजर सिद्ध होईल. जर न्यूझीलंडचा संघाने असा विचार केला की ते भारतीय फलंदाजांवर मात करतील, तर पंत त्यांच्या समोर उभा असेल.’

पंतची स्तुती करताना मांजरेकर यांनी लिहिले की, ‘सहाव्या क्रमांकावर खेळत असलेल्या पंतमध्ये कोणत्याही सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता आहे. आतापर्यंत जरी ही त्याच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात असली तरी त्याने असे दोनदा केले आहे.’

महत्त्वाच्या बातम्या-

Video: ‘पुजाराला तिथे टाळ्या वाजवण्यासाठी उभे नाही केले,’ जेव्हा धोनीने लाईव्ह सामन्यात जडेजाला म्हटले होते असे काही

टीम इंडियाकडे हार्दिक पंड्या आहेच, पण संघाला माझीही तेवढीच गरज; ‘या’ अष्टपैलूचे मोठे वक्तव्य

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारे न्यूझीलंडचे ३ गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---