---Advertisement---

टीम इंडियाकडे हार्दिक पंड्या आहेच, पण संघाला माझीही तेवढीच गरज; ‘या’ अष्टपैलूचे मोठे वक्तव्य

On: शनिवार, मे 15, 2021 6:44 AM
---Advertisement---

अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्यानंतर शिवम दुबेला भारतीय संघाकडून एकदिवसीय आणि टी20 सामने खेळण्याची संधी मिळाली. तथापि या काळात त्याची कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती. आता हार्दिक पांड्याचे पुनरागमन झाल्यामुळे दुबेला संघातून बाहेर करण्यात आले आहे. तसेच आयपीएल 2021 च्या लिलावापूर्वी त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने देखील आपल्या संघातून बाहेर केले होते. यादरम्यानच दुबेने एक विधान केले असून, यात त्याने आपल्या क्रिकेट कारकीर्दीबद्दल काही बाबी सांगितल्या आहेत.

मला सोडण्याच्या निर्णय मी आनंदाने स्विकार केला
आरसीबीने दुबेला बाहेर केल्याबद्दल तो म्हणाला, “अर्थातच मी आरसीबीकडून नंबर 4 अथवा 5 वर फलंदाजी करण्यास प्राधान्य दिले असते. परंतु या सर्व बाबी कर्णधार व संघव्यवस्थापनाच्या हातात असतात. मला नाही वाटत की मी आयपीएल 2020 मध्ये खराब कामगिरी केली. कारण शेवटी मी सलग 2-3 षटकार ठोकत होतो आणि मधल्या षटकात गोलंदाजीही करत होतो.”

दुबे पुढे म्हणाला, “मला सोडण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाचा होता व मी त्या निर्णयाचा आनंदाने स्विकार केला. मला या बाबीचा आनंद आहे की जेव्हा मला फलंदाजी अथवा गोलंदाजी करण्याची संधी मिळाली तेव्हा मी आरसीबी संघासाठी उत्तम कामगिरी केली.”

आरसीबीने दुबेला रिलीज केल्यानंतर आयपीएल 2021 लिलावात राजस्थान रॉयल्स संघाने त्याला 4.40 कोटींची किंमत मोजत आपल्या संघात सामील केले.

भारतीय संघाला अजून एका अष्टपैलूची गरज
भारतीय संघात हार्दिक पांड्याशी होत असलेल्या आपल्या स्पर्धेविषयी बोलताना दुबे म्हणाले, “सध्या संघाकडे हार्दिक पांड्या आहे, परंतु भारतीय संघात आणखी एक अष्टपैलू खेळाडू आवश्यक आहे. कारण अष्टपैलू खेळाडू शोधणे नेहमीच अवघड असते. माझे काम उत्तम कामगिरी करत राहणे आणि निवडकर्त्यांची दारे ठोकणे आहे. आपण इतर देशांमध्ये 2-3 अष्टपैलू खेळताना पाहतो, कारण ते नेहमीच सामन्याची परिस्थिती बदलवू शकतात. भविष्यात मी भारतीय संघात पुनरागमन करेल याची मला खात्री आहे. अधिक अष्टपैलू खेळण्यामुळे भारताच्या विजयाची शक्यता आणखीनच वाढेल. ”

महत्त्वाच्या बातम्या-

अवघ्या ७ दिवसात गाठले ११ कोटींचे लक्ष्य, देणगी देणाऱ्यांचे ‘विरुष्का’ने मानले आभार

‘त्या’ वादग्रस्त विधानावर चाहत्यांकडून ट्रोल होताच टीम पेनने घेतला यु टर्न, दिले स्पष्टीकरण

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारे न्यूझीलंडचे ३ गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---