पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीज राजा यांचे बाबर आझम याच्याविषयीचे एक विधान सध्या चर्चेत आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांना बाबर आझमसोबत लग्न करायचे आहे. खरं तर, बाबर सध्या श्रीलंकेतील लंका प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत खेळत आहे. तो पहिल्यांदाच या स्पर्धेचा भाग बनला आहे आणि सोमवारी (दि. 07 ऑगस्ट) त्याने शतकी खेळी साकारून संघाला विजयही मिळवून दिला. सामन्यात विजयी शतक ठोकल्यानंतर रमीज राजांनी पाकिस्तानी कर्णधाराची जोरदार प्रशंसा केली.
बाबर आझम (Babar Azam) याच्या शानदार फॉर्मविषयी भाष्य करताना रमीज राजा (Ramiz Raja) यांनी एलपीएल 2023 (LPL 2023) स्पर्धेत समालोचन करताना खळबळजनक भाष्य केले. खरं तर, रमीज राजा टी20 क्रिकेट इतिहासातील त्याच्या दहाव्या शतकासाठी शुभेच्छा देत होते. यावेळी ते म्हणाले की, सध्या कौशल्याच्या शिखरावर असलेल्या पाकिस्तानी कर्णधारासोबत त्यांना लग्न करायचे आहे.
काय म्हणाले रमीज राजा?
पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीज राजा म्हणाले की, “दर्जा आणि गुणवत्ता, सहजरीत्या अर्धशतक पूर्ण केले. अशा स्थितीत अशी खेळी खेळणे, तो आपला मुलगा आहे. मी बिल्कुल त्याच्यावर प्रेम करतो आणि त्याच्यासोबत लग्न करायचे आहे.” आता त्यांच्या समालोचनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
https://twitter.com/papukashmiri1/status/1688611000885587968?s=20
विशेष म्हणजे, बाबर आझम हा टी20 क्रिकेटमध्ये 10 शतके झळकावणारा दुसरा फलंदाज आहे. या बाबतीत वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ख्रिस गेल पहिल्या स्थानी आहे. त्याने 22 शतके झळकावली आहेत.
बाबर आझमने स्पर्धेच्या दहाव्या सामन्यात गाले टायटन्स संघाविरुद्ध फलंदाजी करताना 59 चेंडूत 104 धावांची वादळी खेळी साकारली. त्याने या खेळीत 5 षटकार आणि 8 चौकारांची बरसात केली. त्याच्या शतकाच्या जोरावर कोलंबो स्ट्रायकर्स संघाने गाले संघाच्या 189 धावांचे आव्हान 3 चेंडू शिल्लक ठेवत पूर्ण केले आणि सामना 7 विकेट्सने जिंकला. (former cricketer ramiz raja babar azam marry comment lanka premier league video viral)
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! विश्वचषकापूर्वी इंग्लंड दौऱ्यासाठी न्यूझीलंडने निवडला वनडे संघ, दिग्गज खेळाडूंचे कमबॅक
सामना जिंकताच कर्णधार पंड्याचे खळबळजनक भाष्य; म्हणाला, ‘…तर आठव्या क्रमांकावर कुणाचीही गरज नाही’