भारतीय संघ 19 नोव्हेंबर रोजी विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेट्सने पराभूत झाला होता. भारताच्या या पराभवाने संपूर्ण देशाचे मनोबल तोडून टाकले होते. मात्र, संपूर्ण विश्वचषकात शानदार प्रदर्शन करणाऱ्या संघांमध्ये अव्वलस्थानी भारतीय संघच होता. भारताने अंतिम सामना गाठण्यापूर्वी पहिल्या 10 सामन्यात दणदणीत विजय मिळवला होता. तसेच, अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारताच्या निराश खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले होते. अशात मोदींच्या या भेटीवर भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले रवी शास्त्री?
वृत्तसंस्थेशी संवाद साधताना रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भारतीय ड्रेसिंग रूम (Team India Dressing Room) भेटीवर भाष्य केले. ते म्हणाले, “मला वाटते की, हा शानदार निर्णय होता. कारण, मला माहितीये की, ड्रेसिंग रूममधील माहोल कसा असतो. मी प्रशिक्षक म्हणून त्या ड्रेसिंग रूममध्ये 7 वर्षे घालवलीत. क्रिकेटपटू म्हणूनही मी अनेक वर्षे घालवलीत.”
पुढे बोलताना शास्त्री असेही म्हणाले की, “अशा पराभवानंतर दु:ख होते. अशात जेव्हा देशाच्या पंतप्रधानासारखा व्यक्ती जेव्हा तुमच्या ड्रेसिंग रूममध्ये येतो, तेव्हा ही खूपच मोठी गोष्ट असते. कारण, यामुळे खेळाडूंचे मनोबल वाढते. ते कुणी सामान्य व्यक्ती नाहीयेत, जेव्हा स्वत: पंतप्रधान ड्रेसिंग रूममध्ये आले, तेव्हा ही खास गोष्ट आहे. मला माहितीये की, खेळाडूंना कसे वाटले असेल.”
भारतीय संघाच्या विश्वचषक अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशी भेट घेतली होती. त्यांनी यादरम्यान दोन्ही वरिष्ठ खेळाडूंचे मनोबल वाढवले होते. तसेच, त्यांच्याव्यतिरिक्त मोदींनी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि एक-एक करून संघाच्या सर्व खेळाडूंची भेट घेतली होती. (former cricketer ravi shastri praised narendra modi meet indian team dressing room)
हेही वाचा-
“त्याला शिकवण्याची गरज नाही”, रोहितला लक्ष्य करणाऱ्यांवर अश्विन संतापला
BREAKING: पाकिस्तानी अष्टपैलूची तडकाफडकी निवृत्ती, वर्ल्डकपदरम्यान ठरलेला चर्चेचा केंद्रबिंदू , 34 व्या वर्षी घेतला निर्णय