भारतीय क्रिकेट संघ रविवारी (१७ जुलै) मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना खेळण्यासाठी उतरेल. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने १० विकेट्स राखून विजय मिळवला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने जबरदस्त पुनरागमन केले आणि १०० धावांनी हा सामना जिंकला. अशात तिसरा सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकेल. तत्पूर्वी माजी भारतीय गोलंदाज आरपी सिंग याने रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाबद्दल वक्तव्य केले आहे.
भारताचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या फलंदाजी क्रमात (Suryakumar Yadav Batting Position) सातत्याने बदल करण्यावरून आरपी सिंगने (RP Singh) रोहितचे (Captain Rohit Sharma) कान टोचले आहेत.
आरपी सिंग म्हणाला की, “मी या गोष्टीशी सहमत नाही. सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला पाहिजे. कारण तुम्ही याआधी घडलेल्या गोष्टी पाहिल्या तर, विराटने त्याच्या फलंदाजी क्रमात खूप बदल केले आहेत. भारतीय संघासाठी विराटने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याचे नाव बनवले. परंतु बऱ्याचदा त्याने केएल राहुलसाठी आपली जागा सोडली आणि त्याला या क्रमांकावर संधी दिल्या.”
तसेच पुढे विराटची प्रशंसा करताना आरपी सिंगने म्हटले की, “विराटने त्याची जागा दुसऱ्या खेळाडूंसाठी सोडत एक उदाहरण स्थापित केले. तसे तर फलंदाजी क्रमात बदल करण्याचा निर्णय कर्णधारापेक्षा जास्त प्रशिक्षकाचा असतो. राहुल द्रविडने वनडे क्रिकेटमध्ये रिषफ पंतला तिसऱ्या क्रमांकावर बऱ्याचदा आजमावून पाहिले आहे. तर विराट आणि माजी प्रशिक्षक रवि शास्त्रींनीही त्याला २०१९ विश्वचषकावेळी या क्रमांकावर आजमावले होते.”
“परंतु जर तुमच्या संघात कोणी असा खेळाडू असेल, जो पूर्णपणे फिट असेल. तर त्याला तुम्ही त्याच्या आवडत्या क्रमांकावरच फलंदाजीला पाठवले पाहिजे. लोक जरी म्हणत असतील की, एक फलंदाज चांगला आहे, मग त्याला कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीला पाठवा, तो चांगलीच फलंदाजी करेल. परंतु माझ्या हिशोबाने एक फलंदाज त्याच्या एका ठराविक क्रमांकावर खेळण्याबाबत रुळलेला असतो”, असेही त्याने पुढे म्हटले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बर्मिंघम राष्ट्रकुलसाठी टीम इंडिया सज्ज! पदकांच्या लयलूटीची देशवासियांना अपेक्षा
तब्बल ३२ वर्षांनंतर वाढणार भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा रोमांच, २०२३-२७ पर्यंत असा असेल कार्यक्रम
अश्विनच्या ‘स्विच हीट’ विधानावर न्यूझीलंडच्या दिग्गजाचे धक्कादायक वक्यव्य; म्हणाला, ‘बॅन करा….’