---Advertisement---

“धोनीसह अन्य दिग्गजांची जर्सी बीसीसीआयने करावी निवृत्त”, माजी भारतीय क्रिकेटपटूचे मत

---Advertisement---

भारतीय संघ आज ज्या यशाच्या शिखरावर पोहोचला आहे, त्यामध्ये महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि सौरभ गांगुली यांसारख्या दिग्गज खेळाडू महत्त्वाचे योगदान आहे आणि याच कारणामुळे माजी भारतीय क्रिकेटपटूने बीसीसीआयकडे धोनीसह अनेक दिग्गज खेळाडूंचा जर्सी क्रमांक निवृत्त करून त्यांना सन्मान देण्याचे आवाहन केले आहे.

दिग्गज खेळाडूंची जर्सी निवृत्ती करावी – सबा करीम
एकेकाळी निवडकर्ता म्हणून भूमिका बजावणारे सबा करीम म्हणाले की, ज्या दिग्गज खेळाडूंनी मनापासून भारतीय क्रिकेटमध्ये आपले महत्त्वाचे योगदान दिले आहे त्यांचा जर्सी क्रमांक निवृत्त करण्याचे पाऊल उचलले पाहिजे. धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. 2007 ते 2013 या काळात त्यानी आयसीसीच्या तीन ट्रॉफी भारताला कर्णधार म्हणून जिंकून दिले आहेत.

दिग्गज खेळाडूंना आदर मिळेल
करीम म्हणाले पुढे म्हणाले की, ‘मला वाटते की केवळ धोनीची जर्सीच नाही तर बीसीसीआयने इतर अनेक भारतीय दिग्गज खेळाडूंची जर्सी निवृत्त करायला पाहिजे. बीसीसीआयने हे देखील स्पष्ट केले पाहिजे की या दिग्गज खेळाडूंच्या जर्सीचा नंबर कोणालाही दिली जाणार नाही. त्यामुळेच भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडूंची प्रसिद्धी आणि योगदान ओळखता येईल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे असे केल्याने त्या दिग्गज खेळाडूंना सन्मान दिल्या सारखे होईल.’

ऑगस्टमध्ये घेतली निवृत्ती
धोनीने 2019 च्या विश्वचषक उपांत्य फेरीत शेवटचे भारतीय संघाची जर्सी घातली होती. त्यानंतर धोनीने ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सध्या धोनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याअगोदर आणखी काही आयपीएल हंगाम खेळू शकतो.

करीम यांचा असा विश्वास आहे की, धोनी जरी जास्त क्रिकेट खेळत नसला तरी तो भारतातील अनेक युवा खेळाडूंना सल्ला देऊ शकतो. इतकेच नव्हे तर, धोनी एक मेंटरची भूमिका बजावू शकतो.

युवा खेळाडूंना मार्गदर्शन करतो
सबा करीम म्हणाले की, ‘आता धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा भाग नाही. परंतु मला आशा आहे की, धोनी अजून काही वर्षं भारतीय क्रिकेटची सेवा करत राहील. धोनी चेन्नई सुपर किंग्जच्या सहाय्याने बर्‍याच तरूणांना उत्कृष्ट कामगिरीसाठी तयार करत आहे. माझी अशी इच्छा आहे की, धोनी राज्य पातळीवरही युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले पाहिजे. जर तसे झाले तर भारतीय क्रिकेटचे भविष्य चांगले होईल.’

महत्त्वाच्या बातम्या –

शिखर धवन पहिल्यांदाच करणार टीम इंडियाचे नेतृत्व; पाहा कशी राहिली आहे श्रीलंकेविरुद्धची कामगिरी

भारताविरुद्धच्या मालिकेआधी श्रीलंकेचे खेळाडू नाही करणार सराव, ‘हे’ आहे कारण

‘तो’ही चाहर आणि चक्रवर्ती बनू शकतो; धोनीच्या एकेकाळच्या हुकमी एक्क्याला दिग्गजाचा पाठिंबा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---