पुढील महिन्यात 12 जुलैपासून भारताचा वेस्ट इंडिज दौरा सुरू होत आहे. या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघ पुढील आठवड्यात दौऱ्यासाठी संघाची घोषणा करेल. सुरुवातीला दोन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास केला, पण दोन्ही वेळा भारताच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले. या महिन्याच्या सुरुवातीला भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव झाला आणि चॅम्पियन बनवण्याचे स्वप्नही तुटले. यामुळे भारताच्या वरिष्ठ खेळाडूंच्या भविष्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशात भारतीय संघाचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी मोठे भाष्य केले आहे.
काय म्हणाले मांजरेकर?
संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांच्या मते, भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी कमीत कमी 3 नवीन फलंदाज आणि 3 नवीन गोलंदाजांना संघात घेतले पाहिजे. माध्यमांशी बोलताना मांजरेकर म्हणाले की, “जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेड गेम चेंजर होते, जे जास्त टी20 क्रिकेट खेळत नाहीत. त्यामुळे आपल्याला अशा लोकांचा शोध ग्यावा लागेल, जे थकणार नाहीत किंवा ज्यांना आयपीएलला कसोटी क्रिकेटशी जुळवून घेण्याची गरज नाही.”
“वेळ आहे आपण प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बक्षीस देऊया. निवडकर्त्यांनी त्या खेळाडूंवर लक्ष दिले पाहिजे, जे परदेशातील मैदानावर यशस्वी कसोटी खेळाडू बनण्याची क्षमता राखतात. मी कमीत कमी 3 नवीन फलंदाज आणि 3 नवीन गोलंदाजांना पाहू इच्छितो.”
“जेव्हा फलंदाजीची गोष्ट येते, तेव्हा त्यांना फक्त प्रथम श्रेणी क्रिकेटच्या प्रदर्शनावर लक्ष ठेवावे लागेल. त्यांनी किती धावा केल्या यावर नाही. जर तुम्ही देशांतर्गत क्रिकेट जवळून पाहिले, तर तुम्हाला 3, 4 आणि 5 क्रमांकावर फलंदाजी करणारे खेळाडू सापडतील. या खेळाडूंचा बचावात्मक खेळ चांगला आहे. त्यांच्यात धावांची भूक आहे आणि हेच ते खेळाडू आहेत, ज्यांना तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे,” असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणार आहे. या दौऱ्यात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. (former cricketer sanjay manjrekar advice to selector for india test team for west indies tour read)
महत्वाच्या बातम्या-
कौतुकास्पद! एमपीएलमध्ये माजी महिला क्रिकेटपटूंचा सन्मान, दिला Womens Cricketच्या इतिहासाला उजाळा
IPLमध्ये फ्लॉप, पण T20 ब्लास्टमध्ये सुपरहिट, करनने 18 चेंडूत ठोकली फिफ्टी; पाहा 63 सेकंदाचा व्हिडिओ