क्रिकेटप्रेमींना सध्या कोणत्या स्पर्धेची आतुरता लागली असेल, तर ती म्हणजे आयपीएल 2023 स्पर्धेची. आयपीएलचा महारणसंग्राम येत्या 31 मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेची सुरुवात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघातील सामन्याने होणार आहे. या स्पर्धेत वेगवेगळ्या संघांचे खेळाडू आपापल्या संघासोबत जोडले जात आहेत. अशात आता भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी सांगितले आहे की, नेमके कोणत्या संघाची गोलंदाजी सर्वात मजबूत आहे.
संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचे विश्लेषण केले आहे. मांजरेकरांनुसार, बेंगलोर संघाची गोलंदाजी यावेळी मजबूत दिसत आहे. ते म्हणाले की, “त्यांच्या गोलंदाजीत खोली आहे. जर हेजलवूड फिट नसेल, तर त्यांच्याकडे रीस टोप्ले आहे, फिरकीपटूत वनिंदू हसरंगा आहे, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आहेत. त्यांची गोलंदाजी शानदार आहे आणि ग्लेन मॅक्सवेलही गोलंदाजी करतो.” पुढे बोलताना मांजरेकर म्हणाले की, “या आयपीएलमध्ये माझ्या मते, आरसीबीची गोलंदाजी खूपच शानदार आहे.”
खरं तर, आरसीबी आयपीएल 2023 स्पर्धेतील आपले अभियान 2 एप्रिलपासून मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध सुरू करेल. यावेळी सर्वांच्या नजरा विराट कोहली (Virat Kohli) याच्यावर असतील. विराटने मागील हंगामात 16 सामन्यात 341 धावा केल्या होत्या. विराटची बॅट मागील काही महिन्यांपासून आग ओकत आहे. अशात तो यावेळी बॅटमधून काय कमाल करतो, हे पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत.
आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध संघांच्या यादीत सामील असणाऱ्या आरसीबी (RCB) संघाने आतापर्यंत एकदाही विजेतेपद जिंकले नाहीये. अशात फ्रँचायझी यावेळी आपल्या किताबाचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करेल. मात्र, संघ दोनवेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे, पण त्यांना एकदाही विजेतेपद जिंकता आले नाही. मागील हंगामातही बेंगलोर अव्वल 4 संघांमध्ये सामील होता. त्यांना एलिमिनेटर सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. (former cricketer sanjay manjrekar makes bold prediction about rcb ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मला त्याचा इतका राग आलेला, जेवढा त्रिशतक हुकल्यानंतरही आला नव्हता’, सेहवागचे विराटबाबत खळबळजनक भाष्य
VIDEO: चेन्नईत पाऊल ठेवताच स्टोक्सचा राडा सुरू! नेट्समध्येच लावला षटकारांचा धडाका