How To Get Virat Kohli Out? । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यासाठी अवघा एक दिवस बाकी आहे. मात्र, या मालिकेपूर्वी यजमान दक्षिण आफ्रिका संघातील गोलंदाजांपुढे विराट कोहलीला आऊट कसं करायचं? असा प्रश्न असेल. असे असले, तरीही दक्षिण आफ्रिकेचाच माजी दिग्गज खेळाडू एबी डिविलियर्स याने त्याच्या संघाला मोलाचा सल्ला दिला आहे.
एबी डिविलियर्स (AB De Villiers) याने त्याच्या संघाला सांगितले आहे की, विराट कोहली (Virat Kohli) याच्यासारख्या फलंदाजाला बाद कसे केले जाऊ शकते. एबीडीने त्याच्या संघाच्या गोलंदाजांना सल्ला दिला आहे. कारण, त्याला माहितीये की, विराट यजमान संघासाठी किती मोठा धोका ठरू शकतो.
विराटला बाद कसं करायचं?
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळल्या जाणाऱ्या या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी डिविलियर्सने माध्यमांशी संवाद साधला. त्याने यावेळी म्हटले की, “विराट कोहलीसारख्या फलंदाजाला आऊट करण्यासाठीची एकमेव पद्धत चौथ्या स्टम्प चॅनेलवर गोलंदाजी करणे आणि प्रतीक्षेचा खेळ खेळणे एक ऑर्थोडॉक्स पद्धत आहे. त्या एका चेंडूची वाट पाहा, जी थोडी दूर अंतरावरून येताना दिसेल. तुम्ही एका चांगल्या खेळाडूवर हल्ला करू शकत नाही. तो सरळ उभा असतो.”
डिविलियर्सने सचिन तेंडुलकर याचे उदाहरण देत म्हटले की, “तेंडुलकरच्या बाबतीसारखेच, नेहमी आत येणाऱ्या चेंडूची वाट पाहणे, मूर्खपणा आहे. कारण, तो तुम्हाला मिड-विकेटवरून मारेल. त्यामुळे त्या चेंडूंना ऑफ स्टम्पच्या बाहेर (विराटला) टाका आणि एका चेंडूला बॅटची कड लागण्याचा किंवा आत येण्याची वाट पाहा.”
डिविलियर्सने हेही मान्य केले की, संघाला मोहम्मद शमीची उणीव भासेल, जो कसोटी मालिकेचा भाग नाहीये. डिविलियर्सने मान्य केले की, भारताकडे कसोटी मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे. तो म्हणाला, “भारतीय संघ आपल्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम संधीसह (मालिका जिंकत) दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे. पहिल्यांदा त्यांना असे गोलंदाज मिळाले आहेत, जे फक्त लेंथवरच नाही, तर एका लाईनवरही गोलंदाजी करू शकतात. ते काल्पनिक पाचव्या, सहाव्या ऑफ स्टम्प लाईनवर गोलंदाजी करू शकतात. जर तुम्ही त्या कॉरिडोरवर कमीत कमी चार चेंडू खेळू शकला, तर तुम्ही अशाप्रकारे कसोटी जिंकू शकता.”
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेचे वेळापत्रक
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेचे वेळापत्रक पाहिले, तर उभय संघातील पहिला सामना 26 ते 30 डिसेंबरदरम्यान सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्क येथे पार पडणार आहे. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना 3 ते 7 जानेवारीदरम्यान केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानात खेळला जाईल. (former cricketer says the only way to get a virat kohli kind of batter out is read here)
हेही वाचा-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवताच हरमनचे सर्वात मोठे विधान; म्हणाली, ‘कठोर मेहनत आणि संयमाचे…’
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीपूर्वी टीम इंडियात परतला Virat Kohli, ‘या’ कारणामुळे घेतलेली सुटी; झाला खुलासा