---Advertisement---

भारतीय दिग्गजाची संघातून केलेली हाकालपट्टी, ब्लॅकमेल करून साधला फायदा; मैदानावर परतताच ठोकलं द्विशतक

On: रविवार, मे 14, 2023 7:52 PM
Sourav-Ganguly-And-Rahul-Dravid
---Advertisement---

सौरव गांगुली केवळ देशामध्येच नाही, तर संपूर्ण जगामध्ये सर्वोत्तम क्रिकेटर आणि कर्णधार म्हणून ओळखला जातो. तो बीसीसीआयचा माजी अध्यक्षही राहिला आहे. तसेच, त्याच्या शौर्याच्या कहाण्या काही कमी नाहीत. क्रिकेटमध्ये आपल्या धाडसासाठी तो विशेष प्रसिद्ध आहे. खरं तर, 2006 साली ‘दादा’च्या म्हणजेच गांगुलीच्या कारकिर्दीतील सर्वांत मोठा गोंधळ उडाला होता. त्यावेळी त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. त्याला बाहेर बसवणारे दुसरे तसरे कोणी नसून त्याचे प्रशिक्षक होते. ही गोष्ट सर्वश्रुत आहे, पण तुम्हाला माहित आहे का की, दादाच्या परतीचा मार्ग त्या एका जाहिरातीद्वारे झाला होता, तर ब्लॅकमेल करून त्याच्याकडून करवण्यात आले होते.

‘धमकी’मुळे करिअरला मिळाले वळण
ही जाहिरात एका सॉफ्ट ड्रिंक कंपनीची होती, ज्याची ओपनिंग लाइन होती की, आपल्या ‘दादा’ला विसरला तर नाही ना? यावेळी ही कंपनीही अडचणीत आली होती आणि ‘दादा’ही अडचणीत आले होते. अडचणीतून मुक्त होण्यासाठी कंपनीच्या थिंक टँकने ही जाहिरात बनवण्याची योजना आखली होती. मात्र, ही जाहिरात ऐकून आधी गांगुलीने नकार दिला, पण नंतर त्याला आठवण झाली की, त्याचा कंपनीसोबतचा करार 2007 पर्यंत होता. अशा परिस्थितीत जाहिरातीतील मजकुरामुळे त्यांची प्रतिमा खराब होत नाही, तोपर्यंत दादांना ते सोडता येणार नाही. त्यांनी यातून माघार घेतल्यास कायदेशीर मार्ग स्वीकारला जाईल, असेही काही बंधनकारक नियम त्यात होते. गांगुलीला त्या क्षणी दुसरा त्रास मागे लाऊन घ्यायचा नसल्याने त्याने शेवटी होकार दर्शवला.

दुसऱ्या इनिंगमध्ये घेतली धडाकेबाज इंट्री
जाहिरात शूट झाली आणि लगेच बाजारात आली. एक प्रकारे लोकांच्या मनात खळबळ उडवून देणारी ही जाहिरात होती. सगळीकडे लोकांची एकच चर्चा होती. गांगुलीसोबत लोकांच्या भावना जुळायला लागल्या होत्या. अखेर दादा संघात परतला. यानंतर गांगुलीने (Sourav Ganguly) मैदानावर दुसऱ्या डावाची सुरुवात अशा धडाक्यात केली की, त्याला संघातून वगळणाऱ्यांनाही आश्चर्य वाटायला लागले होते.

विश्व कपमध्येही ‘दादा’चा हात
‘दादा’ 2007 चा विश्व कप (world cup 2007) खेळला. भारतीय संघ ग्रूप (Indian team) स्टेजमधून बाहेर पडला असेल, पण गांगुली संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता. या पुनरागमनानंतर गांगुलीने कसोटी कारकीर्दीतील पहिले आणि एकमेव द्विशतक झळकावले होते तेही पाकिस्तानविरुद्ध.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
अफलातून! मॅक्सवेलने सिक्स मारत झळकावली फिफ्टी, सामन्यातील सर्वात लांब षटकार तुम्हीही पाहाच
चिदंबरम स्टेडिअममध्ये धोनीच ‘टॉस का बॉस’, KKRला हरवून CSK करणार का प्ले-ऑफमध्ये एन्ट्री?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---