क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार असलेल्या सौरव गांगुली याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडल्याचे वृत्त आहे. त्याने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून असे संकेत दिले आहेत.
गांगुलीचे ट्वीट-
“माझ्या क्रिकेट प्रवासाला १९९२ मध्ये सुरुवात केली होती. आता २०२२मध्ये कारकीर्दीचे ३०वे वर्ष आहे. तेव्हापासून क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला तुम्हा सर्वांचा पाठिंबा मिळाला आहे. मी प्रत्येक व्यक्तीचे आभार मानू इच्छितो जो या प्रवासाचा एक भाग आहे, मला पाठिंबा दिला आणि आज मी जिथे आहे, तिथे पोहोचण्यास मदत केली. आज, मी काहीतरी सुरू करण्याचा विचार करत आहे, ज्याने मला वाटते की, कदाचित बऱ्याच लोकांना मदत होईल. मला आशा आहे की, माझ्या आयुष्याच्या या नवीन प्रवासात तुमचा पाठिंबा कायम राहील,” असे सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले.
— Sourav Ganguly (@SGanguly99) June 1, 2022
सौरव गांगुली राजकारणात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नसली, तरी यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सौरव गांगुलीच्या घरी गेले होते. अशा स्थितीत गांगुली राजकारणात हात आजमावणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हणाले जय शाह?
गांगुलीने बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडल्याच्या चर्चांदरम्यानच आता बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी माध्यमांशी चर्चा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, गांगुली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही.
गांगुलीची कारकीर्द
सौरव गांगुली याने भारतीय संघाकडून आतापर्यंत ११३ कसोटी सामने आणि ३११ वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने कसोटीत ४२.१७च्या सरासरीने ७२१२ धावा चोपल्या आहेत. तसेच, वनडेत त्याने ४१.०२च्या सरासरीने ११३६३ धावा चोपल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ३८ शतके झळकावली आहेत.
व्हॉ़ट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दक्षिण आफ्रिका- भारत मालिकेसाठी दोन्ही संघ ‘या’ दिवशी होणार मैदानात दाखल; बीसीसीआयने दिली माहिती
बिहारमधला सलूनवाला पंड्याचा जबरा फॅन; जिंकण्याच्या खुशीत स्वत:चं आणि दुकानाचं घातलं बारसं