Sunil Gavaskar On Prasidh Krishna: भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाच्या खेळाडूंविषयी मोठी विधानं केली. या खेळाडूंमध्ये वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याच्या नावाचाही समावेश होता. गावसकरांनी म्हटले, त्यांना याची खात्री नाही की, प्रसिद्ध दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत मोठा स्पेल टाकू शकेल की नाही. आता गावसकरांचे हे विधान चांगलेच चर्चेत आहे.
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या मते, प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) दुखापतीतून पुनरागमन करत आहे. त्यामुळे त्याचे मोठा स्पेल टाकणे खूपच कठीण असेल. गावसकरांनी असेही म्हटले की, त्यांची इच्छा आहे की, प्रसिद्ध कृष्णाने त्यांना चुकीचे सिद्ध करावे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघातील पहिल्या कसोटी मालिकेला 26 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क येथे हा सामना रंगणार आहे. भारतीय संघ सध्या या कसोटीसाठी तयारी करत आहे. भारतीय संघाला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला, जेव्हा मोहम्मद शमी या मालिकेतून बाहेर झाला होता. दुखापतीमुले तो या मालिकेचा भाग होऊ शकणार नाही. त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णा खेळू शकतो.
‘प्रसिद्ध कृष्णाविषयी मला खात्री नाहीये’
सुनील गावसकरांनी प्रसिद्ध कृष्णा याच्याविषयी मोठी शंका व्यक्त केली. ते म्हणाले की, कदाचित तो मोठा स्पेल टाकू शकणार नाही. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावसकर म्हणाले, “प्रसिद्ध कृष्णाविषयी मला तितकी खात्री नाहीये. तो दुखापतीतून आला आहे. जर त्याला एका दिवसात 15-20 षटके गोलंदाजी करावी लागली, तर मला वाटत नाही की, तो असे करू शकेल. आशा करतो की, तो मला चुकीचा सिद्ध करेल. कारण, जर कोणीही मला चुकीचे सिद्ध करतो, तेव्हा याचा अर्थ असतो की, भारत चांगले क्रिकेट खेळत आहे. तसेच, जर भारतीय संघ चांगली कामगिरी करत असेल, तर मी खुश आहे.”
खरं तर, भारतीय संघाकडे वेगवान गोलंदाजाच्या रूपात मुकेश कुमार याचाही एक पर्याय आहे. मात्र, मुकेश किंवा कृष्णा यांच्यापैकी एकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळू शकते. तो खेळाडू कोण असेल, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. (former cricketer sunil gavaskar is not sure about prasidh krishna bowling long spells read )
हेही वाचा-
‘रोहितला ती गोष्ट बदलावीच लागेल…’, वर्ल्डकपनंतर थेट कसोटीत खेळणाऱ्या ‘हिटमॅन’विषयी दिग्गजाचे विधान
BREAKING: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी