Sunil Gavaskar Statement: भारतात नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत रवी बिश्नोई चांगलाच चमकला. त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच, तो टी20तील अव्वल क्रमांकाचा गोलंदाजही बनला. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर मंंगळवारी (दि. 12 डिसेंबर) दुसऱ्या टी20 सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली नाही. याविषयी माजी दिग्गजाने मोठे विधान केले.
काय म्हणाले दिग्गज गावसकर?
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी स्टार स्पोर्ट्सवर रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) याच्याविषयी भाष्य केले. ते म्हणाले की, “बिश्नोई अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला जम बसवत आहे. होय, तो जगातील नंबर 1 टी20 गोलंदाज आहे, पण तरीही तुम्ही त्याला नीट पाहिले, तर कधी-कधी तुम्ही त्याला वेगवान आणि लवकर गोलंदाजी करताना पाहता. अशात जेव्हा तुम्ही एका चांगल्या खेळपट्टीवर वेगान गोलंदाजी करता, तेव्हा फलंदाजासाठी हे सोपे होते. कारण, ते याच वेगाच्या शोधात असतात.”
जडेजासाठी फायदेशीर खेळपट्टी
मात्र, सामना सुरू झाल्यानंतर गावसकरांनी सांगितले की, “ही खेळपट्टी बिश्नोईपेक्षा जास्त रवींद्र जडेजासाठी आहे. जर खेळपट्टी जराही वळण घेत असेल, तर ते जडेजासाठी चांगले आहे. तो इतका साधा चेंडू टाकतो की, फलंदाजाला कोणतीच संधी देत नाही. जर असे झाले, तर त्याची चार षटके भारताला खूप मदत मिळवून देतील.”
पावसाने केला घोळ
गावसकरांनी असेही म्हटले की, “हे भारतीय गोलंदाजांसाठी सोपे नव्हते. तुम्ही पाहू शकत होता की, चेंडू खूपच ओला झाला होता. गोलंदाजांना चेंडू वारंवार पुसावा लागत होता, जे सोपे नसते. चेंडू हातातून निसटत होता. क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू आल्यानंतर निसटत राहिला. भारताच्या हिशोबाने गोष्ट घडल्या नाहीत, पण दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकून यश मिळवले.”
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 19.3 षटकात 7 विकेट्स गमावत 180 धावा केल्या होत्या. यावेळी पावसामुळे यजमान संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकात 152 धावांचे आव्हान मिळाले होते. हे आव्हान त्यांनी 13.5 षटकातच 5 विकेट्स गमावत 154 धावा करत पार केले आणि सामना 5 विकेट्सने नावावर केला. (former cricketer sunil gavaskar said this cricketer still finding his pace in international cricket)
हेही वाचा-
जिद्दीला सलाम! भारतीय खेळाडूला गंभीर दुखापत, तरीही पट्टी बांधून आला फलंदाजीला
भारताच्या रणरागिनींचा जलवा! पदार्पणाच्या कसोटीत शुभा अन् जेमिमाने झळकावली फिफ्टी, संघ मजबूत स्थितीत