इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या 43व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाला आपल्याच होम ग्राऊंडवर पराभवाचा धक्का सहन करावा लागला. लखनऊला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने कमी आव्हानाच्या सामन्यात 18 धावांनी पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुल क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो संघाच्या डावादरम्यान अखेरीस फलंदाजीला आला. मात्र, ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू टॉम मूडी यांनी राहुलच्या फलंदाजीवर मोठी प्रतिक्रिया दिली.
टॉम मूडी (Tom Moody) यांना समजले नाही की, केएल राहुल (KL Rahul) याला जर फलंदाजी करायची होती, तर तो आधी का आला नाही. त्यांच्या मते, राहुलने आधी फलंदाजीला यायला पाहिजे होतं.
खरं तर, आरसीबीच्या डावातील दुसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर फलंदाजाने शानदार फटका मारला. यावेळी राहुल चेंडूला सीमारेषेपूर्वी रोखण्यासाठी धावला. मात्र, यावेळी धावताना राहुलच्या मांसपेशी ताणल्या गेल्या आणि त्यानंतर त्याला मैदानाबाहेर जावे लागले. त्याने यानंतर क्षेत्ररक्षण केले नाही. तसेच, फलंदाजीमध्येही तो सर्वात शेवटी आला, पण त्यामुळे काहीच परिणाम झाला नाही. त्याच्या संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
राहुलच्या फलंदाजी क्रमावर भडकले मूडी
काही लोकांनी दुखापतग्रस्त राहुलच्या अखेरीस फलंदाजीला येण्याच्या निर्णयाची प्रशंसा केली. मात्र, मूडी यांच्यावर त्याचा काहीच प्रभाव पडला नाही. त्यांनी राहुल आणि लखनऊ संघ व्यवस्थापनावर टीकास्त्र डागले. एका क्रिकेट वेबसाईटशी बोलताना ते म्हणाले की, “मी वास्तवात समजू शकत नाही. जर तो मैदानावर उतरणार होता, तर त्याने सामन्यादरम्यान जाऊन पाहायचे होते की, तो तीन-चार चौकार मारू शकतो का. लवकर 12, 20 धावा करेल, किंवा जे काही होऊ शकत होते आणि त्याच्या दुखापतीला अधिक नुकसान होणार नाही. मात्र, जेव्हा त्याने असे केले, तेव्हा मला वाटले की, हे कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त अभिमानास्पद बाब होती. तुम्हाला माहिती आहे. त्याला वाटले की, कर्णधाराच्या रूपात त्याला त्याचे प्रदर्शन आणि संघाचा अभिमान आहे.”
शेवटी फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राहुलला काहीच योगदान देता आले नाही. तो 3 चेंडू खेळला पण त्याला एकही धाव काढता आली नाही. पळत जाऊन धावा घेण्याची संधी होती, पण तो त्याच्या दुखापतीमुळे धावू शकत नव्हता. आगामी सामन्यात राहुल खेळणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (former cricketer tom moody On kl rahul batting position said this read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोण आहे नवीन उल हक? ज्याच्यामुळे विराट अन् गंभीरचं झालं भांडण, अफगाणिस्तानातून आयपीएलपर्यंत कसा आला?
आधी मैदानात नंतर इंस्टावर, नवीनने घेतला विराटशी पंगा! म्हणाला, ‘तू हेच डिझर्व करतो…’