यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे रंगणार आहे. त्यामुळे अवघे २ महिने राहिलेल्या या स्पर्धेसाठी सर्वच संघांची तयारी सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी तर न्यूझीलंडने टी२० विश्वचषकासाठी आपला संघही जाहीर केला आहे. मात्र, या संघनिवडीवर माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राचा असा विश्वास आहे की, न्यूझीलंडचा संघ यंदा टी२० विश्वचषक विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार नाही आणि त्यांना अफगाणिस्तानविरुद्ध कठीण आव्हानाला सामोरे जावे लागू शकते. न्यूझीलंड संघ ग्रुप बी मध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इतर दोन पात्र ठरणाऱ्या संघासोबत साखळी फेरीचे सामने खेळणार आहे.
न्यूझीलंडच्या संघाबद्दल बोलताना आकाश चोप्रा म्हणाला की, केन विलिम्सनच्या नेतृत्वाखालील संघाची अफगाणिस्तान देखील परिक्षा घेईल. तो म्हणाला, तसा, तर हा संघ व्यवस्थित आहे. न्यूझीलंडला भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यासह एका गटात ठेवण्यात आले आहे. स्पर्धा करताना अफगाणिस्तान देखील या संघाला अडचणीत आणू शकतो.
न्यूझीलंडसाठी अंतिम फेरी गाठणे कठीण-आकाश चोप्रा
चोप्राला खात्री नाही की, न्यूझीलंडचा संघ टी -२० विश्वचषक २०२१ च्या अंतिम फेरीत पोहोचेल. चोप्रा म्हणाला की, “मला शंका आहे की, न्यूझीलंड यावेळी स्पर्धा पूर्ण करेल. होय, प्रत्येकाला कसे आश्चर्यचकित करायचे हे संघाला माहित आहे, मात्र, मला या ग्रुपमध्ये पाकिस्तान आणि भारताला पुढे जाण्याच्या अधिक संधी वाटतात.”
४३ वर्षीय चोप्रा म्हणाला. मात्र, न्यूझीलंडसाठी यूएईच्या फिरकीपटूंसाठी उपयुक्त असलेल्या खेळपट्ट्यांवर खेळणे थोडे कठीण असू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
कोण म्हणतं सचिन स्लेजिंग करत नाही? ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराला केले होते स्लेज, व्हिडिओ व्हायरल
शार्दुल ठाकुरचे ‘हे’ छुपे टॅलेंट पाहिले का? रोहित शर्माच्या मुलीसाठी गायले खास गाणे
आरसीबीने करारबद्ध केलेल्या सिंगापूरच्या ‘त्या’ फटकेबाजाची ‘ही’ आहे खासियत