कट्टरपंथी तालिबानने सरकार बरखास्त करत संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. या प्रकरणाचा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरही परिणाम होऊ लागला आहे. त्याचाच भाग म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) लाहोरमध्ये शनिवारपासून सुरू होणारे प्रशिक्षण शिबिर थांबवले. यामुळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात पुढील महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या वनडे मालिकेवर धोक्याचे ढग दाटू लागले आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्ड अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (एसीबी) वतीने मालिका आयोजित करणार आहे.
पाकिस्तानने व्यक्त केली चिंता
पीसीबीने एसीबीला मालिका होईल की नाही याबाबत अंतिम निर्णय कळवावा, असे सांगितले आहे. लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. श्रीलंकेच्या हंबनटोटा येथे ३ सप्टेंबरपासून मालिका होणार आहे. पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले,
“अफगाणिस्तान बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे खेळाडू काबुलहून कोलंबोला कधी रवाना होतील याची पुष्टी केली नाही. सामन्यांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. मालिकेशी संबंधित माहिती मिळताच शिबिराचे आयोजन केले जाईल आणि संघाची घोषणाही केली जाईल.”
अमेरिका तालिबान चर्चा सुरू
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एसीबी तालिबान आणि अमेरिकन सैनिकांशी चर्चा करत आहे, जे काबुल विमानतळावर विमानाचे कामकाज पाहत आहेत. अफगाणिस्तान क्रिकेटच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,
“खेळाडू कोलंबोला कसे आणि केव्हा उड्डाण करतील याचे आम्हाला लवकरच परवानगी आणि संपूर्ण तपशील मिळतील.”
दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान, हसन अली आणि शाहीन शाह आफ्रिदी यांना या मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. टी२० विश्वचषकासाठी प्रमुख खेळाडू ताजेतवाने राहू शकतील, यासाठी हा निर्णय घेतला जाईल. टी२० विश्वचषक यूएईमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कोण म्हणतं सचिन स्लेजिंग करत नाही? ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराला केले होते स्लेज, व्हिडिओ व्हायरल
चेन्नईविरुद्ध कर्णधार विराटने दिली सिंगापूरच्या नव्या भिडूला संधी, वाचा आरसीबीच्या पदार्पणावीराबद्दल
राजस्थान रॉयल्सला आणखी एक झटका, बटलरने घेतली आयपीएलमधून माघार