लखनऊ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स संघात आयपीएल 2023 स्पर्धेतील 30वा सामना इकाना स्टेडिअमवर खेळला गेला. या सामन्यात गुजरातने अखेरच्या षटकात लखनऊवर 7 धावांनी नजीकचा विजय मिळवला. या सामन्यात गुजरातच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला विजयासाठी 36 चेंडूत 31 धावांची गरज होती. तसेच, लखनऊच्या हातात 9 विकेट्सही बाकी होत्या. मात्र, केएल राहुल याच्या नेतृत्वाखालील लखनऊ संघाला 7 धावांनी पराभवाचा धक्का बसला. यानंतर अनेकांनी चोहोबाजूंनी लखनऊवर टीकास्त्र डागले. यामध्ये भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद याचाही समावेश होता. त्याने पुन्हा एकदा राहुलवर निशाणा साधला.
काय म्हणाला वेंकटेश प्रसाद?
वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) याने लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या पराभवानंतर ट्वीट केले. त्यात त्याने लिहिले की, “35 चेंडूत 30 धावांची गरज असेल आणि तुमच्या हातात 9 विकेट्स असतील, तर त्यानंतर तुम्ही धावांचा पाठलाग करताना तेव्हाच अपयशी ठरू शकता, जेव्हा तुम्ही समजण्यापलीकडे फलंदाजी केली आहे. पंजाबसोबत 2020मध्ये असे अनेकदा झाले होते. त्यावेळी संघ अनेक सामन्यात सहजरीत्या जिंकू शकला असता. मात्र, ते हारले होते. या सामन्यातही गोलंदाजीत गुजरात जितका शानदार होता आणि हार्दिकने त्याच्या नेतृत्वात हुशार दिसला, तितकाच लखनऊ संघ बुद्धीहीन दिसला.”
प्रसादचा राहुलवर निशाणा
प्रसादने त्याच्या या ट्वीटमध्ये कोणत्याही खेळाडूचे नाव घेतले नाही. मात्र, त्याचा इशारा हा लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल याच्याकडेच होता. या सामन्यात राहुलने 61 चेंडूत 68 धावा केल्या. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. त्याच्या स्ट्राईक रेटवरही प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वीही वेंकटेशने नुकतेच कसोटी संघातील राहुलच्या निवडीबाबत टीकास्त्र डागले होते. यादरम्यान त्याच्याकडून कसोटीचे उपकर्णधारपदही काढून घेण्यात आले होते.
A monumental turnaround 🤯🤯@gujarat_titans clinch a narrow 7-run victory to get back to winning ways 🙌
Scorecard ▶️ https://t.co/TtAH2CiXVI#TATAIPL | #LSGvGT pic.twitter.com/1H6bd2yVdT
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2023
लखनऊचा 7 धावांनी पराभव
गुजरातविरुद्ध या सामन्यात लखनऊ संघ धावांचा पाठलाग करताना एकेवेळी 15 षटकात 2 विकेट्स गमावत 106 धावांवर होता. स्वत: कर्णधार केएल राहुल आणि निकोलस पूरनही मैदानावर होते. मात्र, इथून पुढे गुजरातच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केले आणि लखनऊला 30 धावाही करू दिल्या नाहीत. यादरम्यान लखनऊने 5 विकेट्स गमावल्या आणि त्यांचा डाव 128 धावांच्या पुढे जाऊच दिला नाही. त्यामुळे गुजरातने लखनऊचा 7 धावांनी पराभव केला. (former cricketer venkatesh prasad react after collapse kl rahul lsg vs gujarat titans ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘अर्जुन तेंडुलकरमुळेच हारली मुंबई इंडियन्स’, भारताच्या माजी दिग्गजाचे कारणासहित स्पष्टीकरण
दोन स्टंप मोडत मुंबईला वानखेडेत लोळवल्यानंतर अर्शदीपचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘माझ्या हृदयाची धडधड…’