---Advertisement---

सुपरफ्लॉप ठरत असलेल्या रोहितविषयी सेहवागची बेधडक प्रतिक्रिया; म्हणाला, ‘तो गोलंदाजांमुळे नाही, तर…’

On: मंगळवार, मे 9, 2023 4:00 PM
Rohit-Sharma
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 54वा सामना मुबंई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात मंगळवारी (दि. 9 मे) खेळला जाणार आहे. हा रोहित शर्मा याचा हंगामातील 11वा सामना असणार आहे. यापूर्वी खेळलेल्या 10 सामन्यात रोहितला फक्त 184 धावाच केल्या आहेत. यादरम्यान तो दोन वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्याच्या या खराब कामगिरीवर अनेक आजी-माजी खेळाडूंनी आपली मते मांडली आहेत. यामध्ये आता वीरेंद्र सेहवाग याच्या नावाचाही समावेश झाला आहे. वीरेंद्र सेहवागची रोहित शर्माबद्दल बेधडक प्रतिक्रिया आली आहे.

वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने म्हटले की, रोहित शर्मा (Rohit Sharma) गोलंदाजांमुळे संघर्ष करत नाहीये, तर तो स्वत:च संघर्ष करत आहे. सेहवागच्या मते, रोहितच्या फलंदाजीत तंत्रशुद्ध फटक्यांची कमतरता नाहीये, फक्त तो मानसिक अडथळ्याला बळी पडत आहे.

सेहवागची मोठी प्रतिक्रिया
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सेहवाग म्हणाला की, “रोहित शर्माचा संघर्ष हा गोलंदाजांशी नाहीये, तर स्वत:शी आहे. त्याच्या मार्गात एक मानसिक अडथळा आहे. त्याच्या फलंदाजीच्या तंत्रात कोणतीही कमतरता नाहीये. त्याच्या डोक्यात काहीतरी गोंधळ आहे. जेव्हा तो यातून पुढे जाईल, तेव्हा तो मागील सामन्यांतील खराब फलंदाजीची कमतरता पूर्ण करेल.”

खूपच कमी आहे फलंदाजी सरासरी
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत रोहितने 10 डावात 200पेक्षा कमी धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेटही खूपच कमी राहिला आहे. त्याने या हंगामात फक्त 18.40च्या सरासरीने आणि 126.90च्या स्ट्राईक रेटने 184 धावा केल्या आहेत. रोहित मागील हंगामातही खराब फॉर्ममध्ये होता. त्याने 14 डावात एकूण 268 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने 19.14च्या सरासरीने या धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे, त्याचा स्ट्राईक रेट हा 120पर्यंतच मर्यादित राहिला होता. म्हणजेच आयपीएलच्या मागील 24 डावांमध्ये रोहितची सरासरी 20 आणि स्ट्राईक रेट 125पेक्षा कमी राहिली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही फ्लॉप
रोहित शर्मा हा त्याच्या मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध शून्यावर बाद झाला होता. यासोबत तो आयपीएलमध्ये सर्वाधिक 16 वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू ठरला होता. रोहित शर्मा मागील एक वर्षांपासून फक्त आयपीएलमध्येच नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही फ्लॉप ठरत आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत नाहीये. (former cricketer virender sehwag comment on rohit sharma batting in ipl 2023 ahead of rcb vs mi)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिझनेस माईंड अंबानींचा ‘घाटे का सौदा’ ठरला आर्चर! दोन वर्षात संघाचे झाले नुकसानच
“आम्हाला कॅप्टनवर विश्वास”,‌‌मुंबईच्या सर्वात तरुण खेळाडूने केली रोहित शर्माची पाठराखण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---