रोहित शर्मा सध्या टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. रोहितने शनिवारी (6 मे) चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात एकही धाव न करता विकेट गमावली. या हंगामातील त्याची आतापर्यंतची एकूण कामगिरी देखील अत्यंत खराब राहिली आहे. संघाचा कर्णधार असल्याने त्याचा कामगिरीवर सातत्याने टीका होतेय. असे असतानाच मुंबई इंडियन्स युवा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन याने मात्र आपल्या कर्णधाराची पाठराखण केली.
रोहितच्या सततच्या खराब कामगिरीमुळे अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी त्याला धारेवर धरले. सुनील गावसकर व के श्रीकांत यांनी देखील त्याच्यावर जहरी टीका केलेली आहे. तसेच सोशल मीडियावर चाहते देखील त्याला ट्रोल करताना दिसले. या परिस्थितीत आरसीबी विरुद्धच्या सामन्याआधी बोलताना ग्रीन म्हणाला,
“रोहित हा दिग्गज क्रिकेटपटू आहे. तो कोणत्याही क्षणी फॉर्ममध्ये येऊ शकतो. त्याने काही सामन्यांमध्ये सुंदर फलंदाजी केली आहे. त्याची लय देखील चांगली असल्याने, त्याच्यावर तुम्ही टीका करू शकत नाही. एक मोठी खेळी आल्यावर गोष्टी निश्चितच बदलतील.”
चालू हंगामात एकीकडे अनेक युवा फलंदाज 400 धावांचा आकडा पार करत आहेत, पण रोहित शर्मा अजूनही 200 धावांचा आकडा पार करण्यात संघर्ष करत आहे. रोहितने आयपीएल 2023मध्ये आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 18.40च्या सरासरीने फक्त 184 केल्या आहेत. रोहितने फक्त दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या एका सामन्यात 65 धावांची खेळी साकारली होती. फलंदाजी करताना रोहित या हंगामात दोन वेळा शून्यावर तंबूत परतला आहे. यादरम्यान आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम देखील त्याच्या नावे जमा झाला आहे.
(Mumbai Indians Allrounder Cameron Green Backs Captain Rohit Sharma After Poor Form)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“आपले खेळाडू वॉर्नरला घाबरतात”, दिग्गजाचा इंग्लंड संघाला घरचा आहेर
BREAKING: जोफ्रा आर्चर आयपीएलमधून आऊट! ‘हा’ टी20 दिग्गज मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील