भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर न्यूझीलंड विरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळण्यासाठी गेलेला आहे. भारतीय संघ 18 जूनपासून साउथम्प्टनच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध हा सामना खेळणार आहे. याच दरम्यान भारताचे माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोघांनाही आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात पाहायची इच्छा दर्शवली आहे. कारण या दोन्ही खेळाडूंची गोलंदाजी आणि फलंदाजी करण्याची क्षमता आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाले की, “मी या दोन्ही स्पिनरला संघामध्ये पाहू इच्छितो. कारण जडेजाने काही मागील काही दिवसांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जडेजा हा एक असा खेळाडू आहे जो मोठमोठे सामने खेळू शकतो. विशेषतः त्यावेळेस जेव्हा संघावर सर्वात जास्त दबाव असतो. मला अजूनही जडेजाची अजिंक्य रहाणे सोबतची भागीदारी लक्षात आहे. परंतु दुर्दैवाने त्यानंतर जडेजाला दुखापत झाली.”
व्हीव्हीएस लक्ष्मण पुढे म्हणाले की, “मला वाटते की जडेजा सातव्या क्रमांकावर उत्कृष्ट फलंदाजी करू शकेल आणि डावखुरा फलंदाज असल्यामुळे संघासाठी हा क्रमांक अतिशय उपयोगी ठरेल. जर गोलंदाजीचा प्रश्न आला, तर त्याच्याकडे वैविध्य आहे. त्याने एक गोलंदाज म्हणून खूप सुधारणा केल्या आहेत. तो कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी सर्व फलंदाजाला गार करू शकतो. आणि त्याच्यामध्ये ते कौशल्य आहे.”
व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी यावेळी अश्विनचे देखील कौतुक केले. आणि त्याला सर्वकालिक महान खेळाडू मानले. व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाले की, “आर अश्विन हा एक सर्वोत्कृष्ट ऑफ स्पिनर आहे. तो कसोटी सामन्यातला एक महान खेळाडू आहे. यात काही शंका नाही. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने भारतासाठी सलग सामने जिंकले आहेत. हे परदेशात त्याच्या क्षमतेचे एक उदाहरण आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या धावांचा प्रवाह ज्या प्रकारे रोखला होता ते कौतुकास्पद होते. त्याचप्रमाणे त्याने अव्वल फलंदाज स्टीव्ह स्मिथला सातत्याने बाद करण्यात यश मिळाले. यातून त्याचा आत्मविश्वास दिसून येतो.” आता लक्ष्मण यांची इच्छा पूर्ण होणार का, हे येत्या तीन दिवसातच स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या:
फुटवर्क कपल! चहल दांम्पत्याचा नवा डान्स व्हिडिओ आला समोर
या कर्णधाराची छातीठोकपणे भविष्यवाणी, म्हणाला भारतच होईल कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता
न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूने उलगडले संघाच्या विजयाचे रहस्य