क्रीडाविश्वातील खेळाडू कधी कोणत्या कारणामुळे चर्चेत येतील, याचा काही नेम नाही. कधी ते त्यांच्या जबरदस्त कामगिरीमुळे, वादग्रस्त वक्तव्यामुळे, तर कधी दुसऱ्या खेळाडूला शुभेच्छा दिल्यामुळेही चर्चेत येतात. असेच काहीसे आता भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याच्याबद्दल झाले आहे. युवराजने प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याला त्याच्या कारकीर्दीतील 700 व्या गोलसाठी शुभेच्छा दिल्या. रोनाल्डोने इंग्लिश प्रीमिअर लीगच्या एका सामन्यात एव्हर्टनविरुद्ध हा ऐतिहासिक गोल केला. आता युवराजचे रोनाल्डोला शुभेच्छा देत केलेले ट्वीट व्हायरल होत आहे. यामुळे त्याला चाहते ट्रोल करत आहेत.
झाले असे की, क्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याने इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये एव्हर्टनविरुद्ध गोल केला. या गोलसोबतच त्याने त्याच्या कारकीर्दीतील 700 गोल पूर्ण केले. फुटबॉलपटू एँटनी मार्शल हा दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याची जागा रोनाल्डोने घेतली होती. रोनाल्डोच्या या कामगिरीनंतर त्याच्यावर सर्व क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारतीय माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) यानेही रोनाल्डोला ट्वीट करत शुभेच्छा दिल्या.
https://twitter.com/ESPNFC/status/1579183079171584001
युवराजचे ट्वीट
युवराज सिंग याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून रोनाल्डोला शुभेच्छा देत ट्वीट केले. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले की, “किंग परत आला आहे. फॉर्म येतो जातो, पण दर्जा कायम राहतो. रोनाल्डो तुझे 700 क्लबमध्ये स्वागत आहे.” युवराजच्या या ट्वीटला 39 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, पोस्टवर 300 हून अधिक कमेंट्सही आल्या आहेत.
https://twitter.com/YUVSTRONG12/status/1579181496166150145
यामध्ये चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी रोनाल्डोला शुभेच्छा दिल्या, तर काहींनी युवराजला या ट्वीटसाठी ट्रोलही केली. रोनाल्डो 700 गोल करणारा पहिला फुटबॉलपटू आहे. अशात युवराजने त्याचे 700 क्लबमध्ये स्वागत करणे चाहत्यांना आवडले नाही. त्यांनी म्हटले की, जर तो असा करणारा पहिला खेळाडू आहे, तर क्लब कसे असू शकते? यावर चाहत्यांनी ट्विटरवर मेजशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एकाने लिहिले की, “भावा तू इंग्रजी शिकून घे थोडे. तो फुटबॉलमध्ये 700 गोल करणारा एकमेव खेळाडू आहे. तू याचा भाग नाहीयेस.”
https://twitter.com/Leo10Cri7/status/1579342935644307456
दुसऱ्या एकाने लिहिले की, “युवी पाजी तुझेही 700 गोल आहेत का?”
https://twitter.com/areyarjun/status/1579185789585747968
आणखी एकाने लिहिले की, “700 क्लबमध्ये स्वागत आहे. तू कोणत्या 700 क्लबमध्ये सामील आहे.”
https://twitter.com/thisisfurky/status/1579191867786555395
दुसऱ्या एकाने ट्वीट करत लिहिले की, “‘700च्या क्लबमध्ये स्वागत’ त्याने 700 गोल केलेत, धावा नाहीत.”
https://twitter.com/GriezmannsAlt/status/1579395768938803202
अशाप्रकारे युवराज रोनाल्डोला शुभेच्छा देत चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. युवराजचे हे ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘काहीतरी करूनच ये, नाहीतर…’, शाहबाजच्या वडिलांनी दिली होती क्रिकेटपटूला ताकीद, आता सगळीकडं गाजतोय
‘यॉर्कर किंग’ बुमराहला कपिल पाजींनी करून दिली राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव, एकाच ओळीत केले ‘क्लीन बोल्ड’