---Advertisement---

जीवघेण्या कॅन्सरला मात देणाऱ्या युवराजने घेतली रिषभची भेट, विस्फोटक पंतला हिम्मत देत म्हणाला…

Yuvraj-Singh-And-Rishabh-Pant
---Advertisement---

भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा गड आपल्याकडेच राखला. 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला 2-1ने धूळ चारली. या मालिकेत भारतीय क्रिकेटप्रेमींनी संघाचा विस्फोटक यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याची खूपच आठवण काढली. खरं तर, मागील वर्षी डिसेंबरच्या अखेरीस रुडकी येथे जाताना रिषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. तेव्हापासून तो उपचार घेत आहे. तसेच, तो क्रिकेटपासूनही दूर आहे. अशात भारतीय संघाचा माजी दिग्गज युवराज सिंग याने नुकतीच पंतची भेट घेतली. यादरम्यानचा फोटोही युवराजने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या पुनरागमनाची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाहीये. मात्र, तो सोशल मीडियाद्वारे त्याच्या तब्येतीविषयीची माहिती चाहत्यांना देत असतो. क्रिकेट जगतात प्रत्येक खेळाडू आणि चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच युवराज सिंग (Yuvraj Singh) हा पंतची भेट घेण्यासाठी गेला होता. त्याने ट्विटरवर पंतसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. यामध्ये तो पंतचा आत्मविश्वास वाढवताना दिसत आहे.

काय म्हणाला युवराज?
युवराज याने पंतसोबतचा फोटो शेअर करत ट्विटरवर लिहिले की, “बेबी स्टेप्स सुरू आहेत. हा चॅम्पियन पुन्हा धमाल करण्यासाठी सज्ज होत आहे. तुला भेटून आणि हसून आनंद झाला. किती सकारात्मक आणि मजेशीर मुलगा आहे. माझ्याकडून तुला पॉवर रिषभ पंत.”

युवराजनेही दिलीये जीवघेण्या कर्करोगाला मात
युवराज सिंग याने 2011च्या विश्वचषकात भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याला मालिकावीर पुरस्कार आणि चार सामनावीर पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. त्यानंतर तो जीवघेण्या कर्करोगाचा शिकार झाला होता. त्यामुळे त्याला क्रिकेटपासून दूर जावे लागले होते. सर्वांनी जवळपास त्याच्या क्रिकेटमधील पुनरागमनाची अपेक्षाच सोडली होती. मात्र, या योद्ध्याने हार मानली नाही. तो कर्करोगाला मात देऊन पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतला.

आता युवराजने पंतलाही हिम्मत दिली आहे. तसेच, पंत मैदानावर कधी परततोय याकडे अवघ्या क्रिकेटविश्वाचे सर्वांचे लक्ष लागले आहे. (former cricketer yuvraj singh reached home to meet rishabh pant and gave his health update)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंचगिरी करून एका दिवसात लाखो कमावणाऱ्या दिग्गज अंपायरचा राजीनामा, 19 वर्षांच्या कारकीर्दीची झाली अखेर

गुजरातने दिला दिल्लीला पराभवाचा धक्का! प्ले-ऑफ्ससाठी जायंट्सच्या आशा कायम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---