एमएस धोनी मैदानावरील त्याच्या संयमशील शैलीसाठी ओळखला जातो. मोठ्या दबावातही तो नेहमीच संयमाने निर्णय घेण्यास सक्षम असतो, यासाठी त्याला ‘कॅप्टन कूल’ म्हणूनही ओळखले जाते. पण वेळोवेळी पडद्यामागचे किस्से समोर येत आहेत की, जेव्हा धोनीला राग येतो तेव्हा बाकी सगळे बघतच राहतात. आता चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेल्या सुब्रमण्यम बद्रीनाथने धोनीबाबत मोठा खुलासा केला आहे.
इनसाइड स्पोर्ट्सशी बोलताना बद्रीनाथने सांगितले की, एमएस धोनी नेहमीच त्याच्या ‘कॅप्टन कूल’ शैलीत राहत नाही. त्याला कधी कधी खूप रागही येते. बद्रीनाथने खुलासा केला की, “धोनी देखील एक माणूस आहे. त्याचाही संयम अनेकदा सुटला आहे. पण मैदानावर असे कधीच घडले नाही. तो विरोधी संघाला कधीच कळू देत नाही की त्याला राग येत आहे.”
पुढे बोलताना बद्रीनाथने सांगितले की, एकदा आरसीबी विरुद्ध सीएसके सामना सुरू होता. त्या सामन्यात चेन्नईला 110 धावांचे लक्ष्य गाठायचे होते. परंतु त्या सामन्यात चेन्नईने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. त्यामुळे संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.
बद्रीनाथने सांगितले की, “मी अनिल कुंबळेच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झालो. आऊट झाल्यानंतर मी ड्रेसिंग रूममध्ये उभा होतो आणि धोनी आत येत होता. त्यानंतर त्याने रागाच्या भरात पाण्याच्या बाटलीला लाथ मारली, जी खूप दूरवर गेली. या घटनेनंतर कोणत्याही खेळाडूने त्याच्याशी संपर्क साधला नाही. आशाप्रकारे चेन्नईच्या माजी खेळाडू ब्रदीनाथने धोनीबाबत मोठी खुलासा केला. वास्तविक, सध्या धोनी आयपीएल 2025 मध्ये खेळणे किंवा न खेळणे या विषयावर चर्चेचे केंद्र बनले आहे. सीएसके लवकरच या प्रकरणी आपला निर्णय देऊ शकते.
हेही वाचा-
दुलीप ट्रॉफीच्या पदार्पणात संजू सॅमसन पुन्हा फ्लॉप; ‘टीम इंडियाचे दरवाजे बंद?
पाकिस्तान क्रिकेट पुन्हा लाजिरवाणे! या क्रिकेटपटूवर फिक्सिंगचे आरोप; प्रकरण 19 वर्षे जुने
ट्रॅव्हिस हेडच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव; इंग्लंडची मालिकेत बरोबरी