बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा सहसंघमालक आहे. तो त्याच्या या संघाच्या अनेक सामन्यांसाठी कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियममध्ये उपस्थित असतो. त्याच्याबरोबर सामना पहाण्याचा अनुभव इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड गोव्हरने सांगितला आहे.
ग्लॉफॅन्ससमवेत क्यू२० सत्रात चाहत्यांशी बोलताना गोव्हर म्हणाला की, भारतात मोठे नाव असूनही, वेगळ्या क्षेत्रातून आलेला असूनही शाहरुखचे खेळाबद्दल प्रेम कौतुकास्पद आहे.
गोव्हर म्हणाले, ‘मी गेल्या वर्षी कोलकात्यात होतो आणि कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात खेळल्या जाणार्या सामन्यासाठी मला आमंत्रित केले होते. मी तिथे भाषण देत होतो आणि तेथून मी थेट इडन गार्डनला गेलो. सामना संपत आला होता आणि मी थेट शाहरुखच्या जवळ गेलो. त्याच्याशी माझी ओळख झाली आणि मग मला कळले की तो क्रिकेटचा किती मोठा चाहता आहे.’
गोव्हर पुढे म्हणाला, ‘मग मला कळले की त्याचा पहिला हेतू तेथे सामना पाहणे हा आहे. त्यावेळी त्याला बसून दीर्घ चर्चा करण्याची फारशी चिंता नव्हती, परंतु त्याला भेटून आनंद झाला आणि मला असे लोक आवडतात. म्हणजे ते जेवढे मोठे आहेत, तशी त्यांना त्यांची स्वतःची प्रतिष्ठा आहे. त्याला क्रिकेट आवडते. हे अविश्वसनीय आहे. केवळ भारतातच नाही, तर असे लोक इंग्लंडमध्ये, जगभरात आढळतात.’
‘मी स्टेडियमवर पोहोचलो तेव्हा सामना केकेआरने सहज जिंकला होता आणि असे असूनही शाहरुखचा फोकस खेळातच होता. पण माझ्यासाठी, त्याला भेटण्याव्यतिरिक्त एक मनोरंजक गोष्ट अर्थातच त्या रात्री मी तिथे उपस्थित असणे ही होती. ईडन गार्डन हे एक मोठे स्टेडियम आहे, अर्थातच त्याची प्रतिष्ठा आणि आकारामुळे तिथे मोठ्या प्रमाणात प्रेक्षक असतात. त्यामुळे तिथे त्यावेळी असणे खास होते आणि शाहरुखच्या भेटीने तो क्षण आणखी खास बनला.’
ट्रेंडिंग घडामोडी –
या दिग्गजाच्या वर्ल्ड इलेव्हन टीममध्ये ४ भारतीयांना स्थान, मात्र विराट कोहलीला जागा नाही
…म्हणूनच चाहते महत्त्वाचे आहेत – रोहित शर्मा
मैदानावर पाय ठेवण्यापुर्वी या ४ गोष्टी हिटमॅन करतो म्हणजे करतोच